कोरोनामुळे सहा जणांनी सोडले प्राण; रुग्ण संख्या 168

नांदेड

नांदेड, बातमी24ःनांदेड जिल्ह्यात गुरुवारी रुग्ण संख्येत पुन्हा भर पडली आहे. 168 नवे रुग्ण सापडले आहेत. तर सहा जणांचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.

521 अहवालांपैकी 316 अहवाल निगेटीव्ह आले असून 168 अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. यात आरटी-पीसीआर तपासणीत 93 तर अंटीजन चाचणीत 75 जणांचा समावेश आहे. तसेच 83 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या1 हजार 215 झाली आहे. जिल्ह्यातील कोरेानाच्या रुग्णांची संख्या 2 हजार 860 झाली आहे. तर उपचार घेत असलेले रुग्ण हे 1 हजार 215 झाले आहेत.
——


जिल्ह्यात सहा जणांचा मृत्यू
गोकुळ नगर येथील 64 वर्षीय पुरुषाचा दि. 5 रोजी, देगलूर येथील 70 वर्षीय पुरुषाचा दि. 5 रोजी, चिखलवाडी येथील 74 वर्षीय पुरुषाचा दि. 5 रोजी, मुखेड तालुक्यातील दापका येथील 80 वर्षीय महिलेचा दि.5 रोजी, मुखेड येथील 74 वर्षीय पुरुषाचा दि. 5 तसेच नांदेड येथील मकबुल नगर भागात राहणार्‍या 65 महिलेचा सुद्धा दि. 5 रोजीच मृत्यू झाला. आतापर्यंत 109 जणांनी कोरोनाच्या संसर्गामुळे प्राण सोडले.
——
तालुकानिहाय अहवाल
नांदेड मनपा क्षेत्र-43, अर्धापुर-4, देगलूर-3, हदगाव-1, मुखेड-21, परभणी-2, नांदेड ग्रामीण-4, भोकर-5, धर्माबाद-3, लोहा-4, उदगीर-1, यवतमाळ-2 असे एकूण 97 जण हे आरटी-पीसीआर चाचणीत पॉझिटीव्ह आले
——–
अंटीजन चाचणीचा अहवाल
नांदेड मनपा क्षेत्र-55, बिलोली-1, हदगाव-1, किनवट-1, नायगाव-1, अर्धापुर-6, देगलूर-8, कंधार-1 व माहूर -1 असे 75 रुग्णांचा समावेश आहे.