संचारबंदीच्या पूर्वसंध्येला कोरोनाचा तडाका; आकडा सहाशे पार

नांदेड

नांदेड, बातमी24ः- कोरोनाच्या रुग्णसंख्येने रविवार दि. 12 जुलै रोजी सहाशेचा टप्पा ओलांडला आहेे. तर दोन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर आज नव्याने 28 रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे बाधित रुग्णंसंख्या 616 इतकी झाली आहे. तर 14 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

जिल्ह्यात शनिवारी 27 रुग्णांची नोंद झाली होती. तर रविवारी सायंकाळी प्रशासनाचा कोरोनाचा अहवाल प्राप्त झाला. यामध्ये 28 रुग्णांचा स्वॅब कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. कोविड केअर सेंटर 11 विष्णुपुरी रुग्णालय-2 व शासकीय रुग्णालय येथील 1 असे 14 रुग्ण बरे झाले आहेत.त्यामुळे आतापर्यंत बरे झालेले रुग्ण संख्या 375 इतकी झाली. तर उपचार घेणार्‍या रुग्णांची संख्या कधी नव्हे इतकी म्हणजे 211 झाली आहे. ज्याप्रमाणे रुग्ण संख्या वाढत आहे,तशी उपचार घेणारे ही रुग्ण वाढत आहेत. आजच्या अहवालात मुखेड व कंधार तालुक्यातील सर्वाधिक रुग्णांची संख्या आहे.

——-
रुग्णांचा तपशीलवार

पत्ता————–स्त्री/पुरुष———-वय
1)धनेगाव(नांदेड)——स्त्री————09

2) वाजेगाव(नांदेड)—–पुरुष———–44

3) मुखेड————पुरुष————33

4) मुखेड————पुरुष————55

5) मुखेड————पुरुष————85

6) मुखेड————स्त्री————-65

7) मुक्रमाबाद(मुखेड)—पुरुष————12

8) मुक्रमाबाद(मुखेड)—पुरुष————32

9) मुक्रमाबाद(मुखेड)—स्त्री————13

10) कावळागाव(मुखेड)—पुरुष———11

11) कावळा(मुखेड)—पुरुष————40

12) कावळा(मुखेड)—स्त्री————-55

13)शंकरगज(धर्माबाद)–पुरुष———–39

14) गांधी चौक(बिलोली)—-पुरुष——-39

15)कुंडलवाडी(बिलोली)—-पुरुष——–46

16)नरसी नायगाव——-पुरुष———–45

17)नरसी नायगाव——-पुरुष———–48

18)नरसी नायगाव——-स्त्री———–65

19)देगलूर शहर ——-पुरुष———–64

19)देगलूर शहर ——-स्त्री————68

20) देगलूर शहर ——-पुरुष———–68

21)विकास नगर(कंधार)—स्त्री———–06

22)विकास नगर(कंधार)—स्त्री———–06

23)विकास नगर(कंधार)—स्त्री———–32

24)विकास नगर(कंधार)—स्त्री———–43

25)विकास नगर(कंधार)—स्त्री———–46

26)विकास नगर(कंधार)—स्त्री———–55

27)विकास नगर(कंधार)—स्त्री———–65

28)विकास नगर(कंधार)—पुरुष———-15

29)काटकळंबा(कंधार)—स्त्री———–55

30)बाजार मोहल्ला(मुदखेड)-स्त्री———-13

31)बाजार मोहल्ला(मुदखेड)-स्त्री———-18
——
तसेच तीन रुग्ण हे परभणी, हिंगोली व लातुर जिल्ह्यातील आहेत.