नांदेड, बातमी विशेषतः नांदेड-वाघाला महानगरपालिकेस पंचवीस वर्षे पूर्ण झाल्याचा निमित्ताने रौप्य महोत्सवी वर्षे साजरे करण्याचा निर्णय महापालिकेच्या वतीने घेण्यात आला असून या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी नांदेडकर नागरिकांना बघायला मिळणार असल्याची माहिती महापौर जयश्री निलेश पावडे यांनी दिली.
यावेळी बोलताना जयश्री पावडे म्हणाल्या,की नांदेड शहराच्या विकासाची पायाभरणी कै. शंकरराव चव्हाण यांनी केली तर पुढील अशोक चव्हाण यांनी या शहराचा चेहरा बदलण्याचे काम केले. नांदेड नगरपालिकेचे रूपांतर महापालिकेत 1997 साली झाले.या घटनेला पंचवीस वर्षे पूर्ण झाले. या निमित्ताने चला हवा येऊ द्या,आदर्श शिंदे यांचा भीम गीत कार्यक्रम,हिंदी कवी संमेलन,मोशायरा,मराठी संमेलन असे विविध कार्यक्रम होणार असल्याचे जयश्री पावडे यांनी कळविले,या कार्यक्रमाबद्दल आमदार अमरनाथ राजूरकर,माजी राज्यमंत्री डी.पी.सावंत यांनी सुद्धा माहिती दिली.यावेळीउपमहापौर गफार, स्थायी समिती सभापती किशोर स्वामी,निलेश पावडे आदींची उपस्थिती होती.