तपासण्या कमी झाल्याने रुग्णसंख्येत घट

नांदेड
नांदेड,बातमी24:- ज्या दिवशी कोरोनाच्या तपासण्या कमी होतात,त्या दिवशी रुग्णसंख्येत घट होत असते,आणि ज्या दिवशी तपासण्या वाढतात,त्या दिवशी मात्र  रुग्णसंख्या  संख्येत वाढ होते,सोमवार तपासण्या कमी झाल्याने रुग्ण संख्या घटल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे रुग्ण संख्या  81 झाली आहे.
सोमवार दि. 17 रोजी 436 नमुने तपासण्यात आले.यात 344 अहवाल निगेटिव्ह 81 जण पॉझिटिव्ह आले आहेत. यात आरटीपीसीआर चाचणीत 43 व अनिटीजन चाचणीत 38 असे 81 जण पॉझिटिव्ह आले.त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णाची संख्या 4 हजार 187 झाली आहे.
जिल्ह्यातील विविध रुग्णालय व कोविड केअर सेंटर येथील उपचार घेत असलेल्या 63 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.तर रविवारी व सोमवारी प्रत्येकी एका रुग्णांचा मृत्यू झाला. यात नांदेड येथील सरपंचवाडी येथील 70 वर्षीय महिलेचा खासगी रूग्णालयात दि.16 रोजी मृत्यू झाला.तसेच उमरी तालुक्यातील  गोरठा येथील 55 महिलेचा दि.17 रोजी असे आतापर्यंत 149 रुग्ण मरण पावले आहेत.तर 1 हजार 534 जणांवर उपचार सुरू आहेत. यात 184 जणांची प्रकृती गंभीर आहे