दिलीप पा. बेटमोगरेकर यांचा पदावर नसताना ही वकुब कायम

नांदेड

नांदेड,बातमी24:- जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून जिल्ह्याच्या ग्रामीण भागावर छाप पडणारे तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर यांचा वकुब पदावर नसतानाही कायम आहे.निमित्त होत त्यांच्या वाढदिवसाचे होय.

सन 2012 साली जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलेल्या दिलीप पाटील बेटमोगरेकर यांना माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली. अशोक चव्हाण यांनी दिलेल्या संधीच सोन करत अत्यंत ताकदीने त्यांनी अडीच वर्षे अध्यक्ष पदाची जबाबदारी पार पाडली. त्यांच्या कार्यकाळात  अध्यक्ष म्हणून ग्रामीण भागात मोठी छाप निर्माण केली. त्या वेळी देशात व राज्यात काँग्रेस सत्ता होती. करोडो रुपयांचा निधी जिल्हा परिषदेला मिळत असत,त्यामुळे गाव तिथे दिलीप पाटील बेटमोगरेकर हे निधी देताना हात आखडता घेत नसत. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रत्येक गावात दिलीप पाटील बेटमोगरेकर यांची लोकप्रियता जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून सर्वदूर अशी निर्माण झाली.

अध्यक्षीय कारकीर्दीमध्ये दिलीप पाटील बेटमोगरेकर यांनी अधिकारी,पदाधिकारी, सदस्य व कर्मचारी यांच्यावर मोठी पक्कड निर्माण केली होती. ती पक्कड आजही कायम आहे,हे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने यावेळी सुद्धा अधोरेखित झाले. दिलीप पा. बेटमोगरेकर यांना वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी शेकडोच्या संख्येने राजकारणातील त्यांचा मित्र परिवार एकत्र आला होता,तसेच अधिकारी-कर्मचारी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन अभिष्टचिंतन केले. यावेळी पक्षाच्या वतीने ही त्यांना शुभेच्छा दिल्या गेल्या.