जि. प. आणि पं.स. समिती सदस्यांचे प्रश्न शासनदरबारी मांडू-जि.प.सभापती बेळगे

नांदेड

नांदेड,बातमी24:-स्थानिक स्वराज्य संस्थेत जिल्हा परिषदेला अन्यासाधरण महत्व आहे.मात्र का संस्थेत काम करणाऱ्या लोक प्रतिनिधींना शासनाकडून विशेष दर्जा मिळावा,यासाठी जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्यांचे प्रश्न शासनदरबारी मांडू असे जिल्हा परिषद व पंचायत समिती असोसिएशनचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष तथा नांदेड जिल्हा परिषद शिक्षण सभापती संजय बेळगे यांनी सांगितले.

जिल्हा परिषदमधील सक्रिय सभापती म्हणून संजय बेळगे यांची ओळख जिल्हाभरात आहे.जिल्हा परिषद सदस्य म्हणून बेळगे यांची दुसरी टर्म असून यापूर्वी ते शिक्षण सभापती होते यावेळी सुद्धा ते विद्यमान सभापती आहेत.जिल्हा परिषद व पंचायत समिती असोसिएशनची राज्य भरतील कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे.यामध्ये जिल्हाध्यक्ष म्हणून संजय माधवराव बेळगे यांची नियुक्ती संघटनेच्या वतीने जाहीर करण्यात आली.

जिल्हा परिषद व पंचायत सदस्य यांना ग्रामीण भागातील विकास कामांसाठी पुरेसा निधी मिळत नाही. त्याचसोबत ग्रामीण भागातील नागरिकांचे प्रश्न राज्य पातळीवर घेऊन जाण्यासाठी संघटना महत्वाचं माध्यम आहे,यातून जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्यांचे प्रश्न मांडले जातील,यातून शासनाकडून न्याय मिळवण्याचा प्रयत्न असेल असे संजय बेळगे यांनी सांगितले.