जि. प. सभापतींच्या बंगल्यावरील शिपाई पॉझिटीव्ह; जि.प.अध्यक्ष बंगल्यावर मुक्कामी

नांदेड

नांदेड, बातमी24ः आमदार अमरनाथ राजुरकर कोरोना पॉझिटीव्ह निघाल्याने संपर्कात आलेल्या काहींनी धास्ती घेतल्याचे समजत. यातच एका जिल्हा परिषद सभापतींच्या बंगल्यावर काही विश्रांती घेतली होती. या बंगल्यावरील एका शिपाई कोरेाना पॉझिटीव्ह आला आहे. तर शनिवारच्या बैठकीस राजूकर यांच्यासमवेत हजर असलेल्या लोकप्रतिनिधी व अधिकार्‍यांनी स्वतःला होम क्वॉरंटाईन करून घेतले, असून जिल्हा परिषद अध्यक्ष मंगाराणी अंबुलगेकर यांनी कधी नव्हे पहिल्यांदा शासकीय बंगल्यावर मुक्काम हलविला आहे.

आ. राजूरकर यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्यानंतर आज दुपारी ते उपचारासाठी मुंबईला रवाना झाले आहेत. शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाल्यानंतर राजूरकर व काही सहकारी हे शिक्षण सभापती संजय बेळगे यांच्या बंगल्यावर काही वेळ बसले होते. राजूरकर हे पॉझिटीव्ह आल्यानंतर येथील बंगल्यावरील कर्मचार्‍यांची चाचणी घेण्यात आली. यात एक तरूण कर्मचारी पॉझिटीव्ह आल्याची चर्चा आहे.
——
मंगाराणी अंबुलगेकर शासकीय बंगल्यावर…
शनिवारच्या बैठकीत अमरनाथ राजूरकर हे हजर राहिल्याने त्या बैठकीतील सर्व अधिकारी हे होम क्वॉरंटाईन झाले आहेत. तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष मंगाराणी अंबुलगेकर या सुद्धा होम क्वारंटाईन झाल्या. मात्र त्यांनी शासकीय बंगल्यावर मुक्काम हलविला आहे.