रंगभरण तसेच चित्रकला स्पर्धेचे 17 रोजी बक्षीस वितरण

नांदेड

 

नांदेड,बातमी24:-नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटी तसेच मिडीया पार्टनर दै. लोकमत व दै.सत्यप्रभाच्या संयुक्त विद्यमाने माजी केद्रीय गृहमंत्री डॉ.शंकरराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त फेब्रुवारी महिन्यात कुसूम महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवांतर्गत घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय रंगभरण व चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांचा बक्षीस वितरण सोहळा मराठवाडा मुक्तीदिनाचे औचित्य साधून दि.17 सप्टेंबर रोजी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे.

दि.17 सप्टेंबर रोजी येथील कुसूम सभागृहात सकाळी 10 वाजता होणार्‍या या सोहळ्यास शिवसेनेेचे खा.हेंमत पाटील, आ.बालाजीराव कल्याणकर, माजी पालकमंत्री डी.पी.सावंत, आ.मोहन हंबर्डे, आ.माधवराव पा.जवळगावकर, आ.रावसाहेब अंतापूरकर, आ.शामसुंदर शिंदे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, महापौर सौ.दिक्षाताई धबाले
आदिंची उपस्थिती राहणार आहे.

ही भव्य-दिव्य अशी रंगभरण व चित्रकला स्पर्धा 26 फेब्रु. रोजी घेण्यात आली होती. परंतु स्पर्धेनंतर लागलीच कोरोनाचा प्रादूर्भाव वाढल्यामुळे बक्षीस वितरण सोहळा होऊ शकला नाही. त्यामुळे आता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सोशल डिस्टन्सींगचा वापर करून केवळ निमंत्रीतासाठीच हा कार्यक्रम आयोजित केला आहे.

या सोहळ्यास उपस्थित रहावे असे आवाहन आ.अमरनाथ राजुरकर, जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, दै.सत्यप्रभाचे कार्यकारी संपादक संतोष पांडागळे यांनी केले आहे.