कोरोनामुळे भाजप महानगर उपाध्यक्ष उभयनलाल यादव यांचे निध

नांदेड

 

नांदेड,बातमी24;- भाजपचे महानगर उपाध्यक्ष उभयनलाल यादव यांचे कोरोनाच्या संसर्गामुळे शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास निधन झाले. उभयनलाल यादव हे भाजपचे जेष्ठ सहकारी होत.

काही दिवसांपूर्वी उभयनलाल यादव यांची कोरोनाचा स्वब पॉझिटिव्ह आला होता. उपचार सुरू असताना शुक्रवारी रात्री त्यांचे निधन झाले. उभयनलाल यादव यांच्या निधनामुळे भाजप महानगराच्या वतीने आयोजित करण्यात आलेले महाराणा चौक,नालेशवर तसेच सोनखेड येथील रास्ता रोको आंदोलन रद्द करण्यात आले आहेत, अशी माहिती महानगराध्यक्ष प्रवीण साले, दिलीप ठाकूर यांनी दिली.
———–
मागच्या आठवड्यात उभयनलाल यादव यांच्या संपर्कात आल्याने महानगर अध्यक्ष प्रवीण साले, भाजप महानगर सरचिटणीस विजय गंभीरे व भाजप तरोडा मंडळाध्यक्ष सुर्यकांत कदम हे आले होते.