विदेशी दारूचा साठा जप्त

नांदेड

 

नांदेड,बातमी24:- विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या एकास रंगेहात पकडण्यात आले,असून या आरोपीकडून दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे.ही कारवाई राज्य उत्पादन शुक्ल विभागाने शुक्रवार दि. 3 जुलै रोजी केली.अशी महिती राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक निलेश सांगडे यांनी दिली.

लोहा तालुक्यातील मारतळा येथे वाहन चालक आरोपी संग्राम नरेंद्र कुंभार (राहणार जाब तालुका मुखेड) येथील यास धाड टाकून अटक केली.

आरोपी संग्राम कुंभार याच्याकडून मॅक्डोल नंबर। 1 व इम्प्रेएल ब्लू नंबर 1 अशी 112 लिटर दारू पकडण्यात आली. ही कारवाई भरारी पथक निरीक्षक पी.ए. मुळे, दुययम निरीक्षक व्ही.बी.मोहाळे, ए. के.शिंदे, जवान एस.ए.नांदगावे, एम.टी. सुरनर,आर.बी. जाधव यांच्या पथकाने केली.