नाष्टा आणि उकाड्यावरून सर्वसाधारण सभा तहकूब

नांदेड

 

नांदेड,बातमी24:- सर्वसाधारण सभा सभापती एकटे नाष्टा खात असल्याने आणि सभागृहात उकाडा होत असल्याने जिल्हा परिषदेचे सर्वसाधारण सभा तहकुब करण्याची नामुष्की ओढवली.अशा प्रकारे सभा तहकुब होण्याची पहिलीच वेळ आहे.

सर्वसाधारण सभा बुधवार दि.16 रोजी दुपारी एक वाजता सुरू झाली.यावेळी कोरोनाच्या संसर्गामुळे निधन पावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कोरोना मुक्त भोसी गाव केल्याबद्दल जिल्हा परिषद सदस्य प्रकाश भोसीकर यांच्या अभिनंदनाचा ठराव सर्व पक्षीय सदस्यांनी घेतला.नांदेड जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे तीन डिव्हिजन केल्याबद्दल माणिक लोहगावे, साहेबराव धनगे,गजानन गँगसागर,चंद्रसेन पाटील,समाधान जाधव आदी सदस्य आक्रमक झाले.

सभेत शिक्षण सभापती संजय बेळगे हे एकटे नाष्टा करत असल्यावरून सदस्य यांनी आक्षेप घेतला.यावेळी मला शुगर आणि बीपी असल्याचे कारण बेळगे यांनी सदस्यांना दिले.मात्र या विषयावर अवांतरः चर्चा रंगत गेली. बेगळे यांनी सदस्यांना अंगावर घेण्याचा प्रयत्न केला आणि सदस्य विरुद्ध बेगळे असे चित्र सभागृहात निर्माण झाले.त्यामुळे नाष्टा हा सभेत कळीचा मुद्दा ठरला आणि यावर बराच वेळ वातावरण तापले.

सभागृहात तापलेल्या वातावरणात सभागृहातील एसी आणि पंखे बंद असल्याची अपशकुन चर्चा पुढे आली,की सर्च सदस्य पुन्हा आक्रमक झाले.यावेळी साहेबराव धनगे यांनी तर अंगातील शर्ट काढून बसतो,इतकी तगमग होत असल्याचे सभागृहाच्या निर्देशनास आणून दिले. जोपर्यंत पंखे आणि एसी सभागृहात लागत नाही, तोपर्यंत सभा घेतली जाऊ नये,असा पवित्रा सर्व सदस्यांनी घेतला.हा गोधळ इतका वाढला,की शेवटी सभा तहकुब करण्याची घोषणा प्रशासनास करावी लागली.आतापर्यंत जण हिताच्या मुद्यावर सभा तहकुब झाल्याचे बघायला मिळाले.मात्र यावेळी न सभागृहात पंखे,एसी बंद आणि एकच सभापतीस नाष्टा दिल्याच्या कारणावरून तहकुब करण्याची वेळ आली.