जीवाची पर्वा न करता सेवा करणे मोठ धाडस:-सीईओ ठाकूर

नांदेड

नांदेड,बातमी24:-आजच्‍या घडीलाही कोरोना सारख्‍या महाभयंकर संकट काळात परिचारिकांची भूमिका अत्‍यंत महत्‍वाची ठरत आहे. कुटूंब, मुलं व प्रसंगी आपल्‍या जीवाची पर्वा न करता दिवस-रात्र झटून अत्‍यंत चोखपणे त्‍या सेवा बजावत आहेत. वैद्यकिय क्षेत्रात परिचारिका म्‍हणून त्‍यांचे योगदान अमूल्‍य असल्याचे प्रतिपादन सीईओ वर्षा ठाकूर यांनी केले.जगभरात दिनांक 12 मे रोजी फ्लोरेन्स नाईटिंगेल यांचा जन्मदिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्‍त जिल्‍हयातील सर्व परिचारिकांना जिल्‍हा परिषद अध्‍यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे व जिल्‍हा परिषद उपाध्‍यक्षा तथा आरोग्‍य सभापती पद्मा नरसारेड्डी सतपलवार यांनी शुभेच्‍छा दिल्‍या आहेत.

यावेळी प्रातिनिधीक स्‍वरुपात नेरली येथील आरोग्‍य उपकेंद्रातील रोहिणी कटारे व पावडेवाडी उपक्रेंद्रा‍तील शिवनंदा झूंजूरवार यांचा बुके व शुभेच्‍छा पत्रक देवून मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी सत्‍कार केला. यावेळी जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, जिल्‍हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ. विद्या झिने, डॉ. शिवशक्‍ती पवार, तालुका आरोग्‍य अधिकारी डॉ. बी.एम. मिरकुटे आदींची उपस्थिती होती.

यानिमित्‍त आज जिल्‍हयातील सर्व परिचारिकेशी जिल्‍हा परिषद अध्‍यक्षा मंगाराणी अंबुलगेकर व मुख्‍यकार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी ऑनलाईन संवाद साधला.

संवाद साधतांन मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर म्‍हणाल्‍या, रुग्‍ण हा डॉक्‍टरांपेक्षा अधिक काळ परिचारिकेच्‍या देखरेखेखाली असतो. रुग्‍णलयात दाखल झालेल्‍या रुग्‍णांची परिचारिका या अहोरात्र सेवा करीत असातात. रुग्‍णाला सकारात्‍मकता प्रदान करण्‍याचे, रुग्‍णांचे मनोबल वाढवून त्‍यांचे सुश्रुषा करण्‍याचे महत्‍वाचे कार्य परिचारिका करत असतात. आजच्‍या घडीलाही कोरोना सारख्‍या महाभयंकर संकट काळात परिचारिकांची भूमिका अत्‍यंत महत्‍वाची ठरत आहे. कुटूंब, मुलं व प्रसंगी आपल्‍या जीवाची पर्वा न करता दिवस-रात्र झटून अत्‍यंत चोखपणे त्‍या सेवा बजावत आहेत. वैद्यकिय क्षेत्रात परिचारिका म्‍हणून त्‍यांचे योगदान अमूल्‍य असून या लढवय्या परिचारिकांचे त्‍यांनी यावेळी कौतुक केले.

जिल्‍हा परिषद अध्‍यक्षा मंगाराणी अंबुलगेकर यांनी परिचारिकांशी संवाद साधला. त्‍या म्‍हणाल्‍या, गेल्‍या वर्षभरापासून कोवीडचा सामना करण्‍यासाठी आरोग्‍य विभागातील महिला कर्मचा-यांचे मोठे योगदान लाभत आहे. परिचारिका व अंगणवाडी कार्यकर्ती यांनी माझे कुटूंब माझी जबाबदारी या मोहिमेत सक्रिय सहभाग घेवून कोवीडसह इतर सांसर्गिक रोगांचा प्रसार रोखण्‍यासाठी गृहभेटी करुन सर्वेक्षण केले. दुर्गम भागातही त्‍यांनी आरोग्‍यसुविधा पोचविल्‍या आहेत. आरोग्‍य सेवेत त्‍या नेहमी तत्‍परतेने काम करत आहेत. अशा परिचारिकांचा आज सन्‍मानाचा दिवस आहे. त्‍यांच्‍या हातून भविष्‍य काळातही असीच सेवा निरंतर घडत राहो, अशी अपेक्षा त्‍यांनी यावेळी व्‍यक्‍त केली. या प्रसंगी जिल्‍हयातील विविध प्राथमिक आरोग्‍य केंद्र व उप केंद्रातील परिचारिकांनी जिल्‍हा परिषद अध्‍यक्षा मंगाराणी अंबुलगेकर व मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्‍याशी संवाद साधून मनोगत व्‍यक्‍त केले.

*चौकट*
जागतिक परिचारिका दिनानिमित्‍त जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा मंगाराणी अंबुलगेकर व मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घूगे यांनी ऑनलाईन संवाद साधल्‍यामुळे जिल्‍हयातील सर्व परिचारिका भारावून गेल्‍या. संवादाच्‍या माध्‍यमाने मन मोकळं करता आले. वेळोवेळी असेच वरिष्‍ठांचे आर्शिवाद व मार्गदर्शन मिळाल्‍यास काम करण्‍यास प्रेरणा मिळेल. कोवीड काळात आम्‍ही काम आणि काम करत आहोत. परंतू आज जागतिक परिचारिका दिनानिमित्‍त मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी संवाद साधून अडचणी व प्रश्‍न जाणू घेतले. आजच्‍या संवादातून आम्‍हास नवी उभारी मिळाल्‍याचे मत अनेक परिचारिकांनी बोलून दाखले.