नांदेड, बातमी24ः- कोरोना विषाणुची साखळी तोडण्यासाठी आठ दिवसांची संचारबंदी करण्यात आली आहे.संचारबंदी आदेशाची प्रत्येक नागरिकांनी करायची आहे. त्यामुळे अत्यावश्यक बाब वगळता रस्त्यावर याल तर गय केली जाणार नसून दंडासह पोलिसांच्या दंडुक्याचा प्रसादही मिळणार असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिला.
नांदेड जिल्ह्यात रात्री बारा वाजल्यापासून संचारबंदी आदेश लागू झाला आहे. मागच्या तीन ते चार दिवसांपासून जिल्ह्यात संचारबंदी आदेशाची अंमलबजावणीचे नियोजन केले जात आहे. यासाठी नाके लावण्यात आलेले आहे. घराबाहेर विनाकारण पडू नका, असे आदेश ही दिले आहेत. अत्यंत अत्यावश्यक बाब असेल तरच बाहेर येण्यास मुभा असेल, त्याव्यतरिक्त कुणालाही बाहेर पडता येणार नाही. असे यापूर्वी डॉ. इटनकर यांनी ठणकावून सांगितले आहे.
या आदेशाची कडक अंमलबजावणीस सुरुवात झाली असून शासकीय कर्मचारी व वैद्यकीय क्षेत्रातील नागरिक वगळता सकाळी कुणी फ ारसे रस्त्यावर उतरल्याचे दिसून आले नाही. नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर येऊ नये, असे आवाहन करत खुद जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर हे रस्त्यावर उतरले. शहरातील काही भागात जाऊन पाहणी केली. या वेळी येणार्या-जाणार्या वाहनांची तपासणी करत चालकांना बाहेर येण्यामागचे कारण विचारले, यापुढे बाहरे पडला तर याद राखा अशी ताकीद द्यायला डॉ. इटनकर हे विसरले नाहीत.
——
जनतेच्या हिताचा विचार करून संचारबंदी सुरु केली आहे. आठ दिवस कुणीही घराबाहेर पडू नये, प्रत्येकाने कोरोनोच्या संसर्गापासून स्वतःचे आरोग्य जपल पाहिजे.
डॉ. विपीन इटनकर ःजिल्हाधिकारी नांदेड.
——
संचारबंदीच्या नियमांचा भंग करणार्या कुणाची सुद्धा गय केली जाणार नाही. नागरिकांनी स्वतःहून नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. संचारबंदीचा भंग करणार्यांना दंड व पोलिसांच्या लाठीचा प्रसाद मिळणार
विजयकुमार मगरःपोलिस अधीक्षक नांदेड.