ऑनलाईन सभेवरून पदाधिकारी-अधिकारी सदस्य गोंधळलेल्या परिस्थितीत
नांदेड, बातमी24ः- नांदेड जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सोमवार दि. 15 जून रोजी दुपारी एक म्हणजेख अर्धा तासाने सुरु होईल. पहिल्यांदा ऑनलाईन सभेचा प्रयोग जिल्हा परिषदेकडून केला जात असल्याने पदाधिकारी, अधिकारी व सदस्यांच्या मानसिकता गोंधळल्यासारखी झाली आहे. त्यामुळे सभा किती वेळ चालणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमिवर शाररीक अंतर राखणे महत्वाचे झाले आहे. जेनेकरून कोरोनाचा संसर्गाचा प्रादुर्भाव न वाढण्यासाठी ऑनलाईन सर्वसाधारण सभा आयोजि केली आहे. या सभेच्या आयोजनावरून भाजपच्या काही सदस्यांनी आक्षेप नोंदवित सर्वसाधारण सभा प्रत्यक्ष मोठया सभागृहात घेण्याची मागणी केली होती.
प्रशासनाने ऑनलाईन घेण्याबाबतचा निर्णय कायम ठेवला आहे. गुगल मिट या ऑनलाईन अॅपच्या माध्यमातून पदाधिकारी, अधिकारी व सदस्य जोडले जाणार आहेत. ज्या सदस्यांना हे तंत्र जमू शकणार नाही, अशांसाठी पंचायत समितीस्तरावर व्यवस्था करण्यात आली आहे. असे असले,तरी पदाधिकारी व अधिकार्यांच्या मनात ऑनलाईन सर्वसाधारण सभेबाबत साशंकता आहे. त्यामुळे सभा यशस्वी होईल, की नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.