जयभिमनगरमध्ये पुन्हा रुग्ण संख्येत वाढ; नांदेड शहरात 81 वाढले

नांदेड

नांदेड, बातमी24ः कोरोनाचा संसर्ग थांबविणे आता अशक्य होत चालले आहे. झपाटयाने वाढत जाणारी रुग्णसंख्या चिंतेचा विषय ठरत आहे. मागच्या दोन दिवसांमध्ये जयभिम नगर सारख्या दाटी-वाटीच्या वस्तीमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. बुधवारी 21 तर गुरुवारी 15 नवे सापडले आहेत. मागच्या दोन दिवसांमध्ये 36 रुग्ण सापडले आहेत. तर आज एकटया हदगावमध्ये 15 रुग्ण व देगलूर तालुक्यात 17 रुग्ण आढळून आले.

मागच्या काही दिवसांपासून आरटी-पीसीआर व अंटीजंन किटव्दारे तपासणी करण्यात येत आहे. मागच्या चौविस तासांमध्ये 656 चाचण्या करण्यात आल्या. यात 117 रुग्ण सापडले. यात आरटी-पीसीआर चाचणीत 75 व अंटीजन किटव्दारे घेतलेल्या चाचणी 42 सापडले. आरटी-पीसीआर चाचणीमध्ये नांदेड,20 तर अंटीजन चाचणीत 39 जण एकटया नांदेड शहरातील होते.
——
शहर———-संख्या——-पुुरुष—–स्त्री
1) नांदेड——-20———16—–04

2) अर्धापुर——01———01—–00

3) बिलोली—–03———02——01

4) देगलूर——-17———12—–05

5) धर्माबाद—–01———-01—–00

6) हदगाव——15———-10—–05

7) कंधार——-08———-07—–01

8) लोहा——-01———–01—-00

9) मुखेड——03———–03—-00

10) उमरी——01———–01—-00

11) पूर्णा, परभणी-01———–01—-00

12) नायगाव—–04———-03—–01
———————–
अंटीजन किटव्दारे चाचणी
1) नांदेड——–39———22——17

2) देगलूर——-01———01——00
3) दापका, मुखेड——01—–01—00

4) रिठा, भोकर——-01——-00—00
——-