बेजबाबदारी नागरिकांना भवतेय

नांदेड

नांदेड, बातमी24ः- कोरोनामुळे पोलिसांवर आलेला ताण टाळेबंदीत शिथिलता दिल्यानंतर काही काळ निवळला होता.परंतु जिल्हाधिकार्‍यांनी कडक अंमलबजावणीचे आदेश दिल्यानंतर पोलिसांवरील जबाबदारी पुन्हा वाढली, असून कोरोनाच्या नियमांचे पालन न करणार्‍यावर दंडात्मक कारवाई सुरु केली आहे.

जिल्ह्यातील कोरेानाच्या रुग्णांची संख्या रोजची-रोज वाढत आहे. वाढत्या कोरेानाच्या रुग्णांमुळे प्रशासनावर ताण येत आहे. तर सामान्य नागरिक भितीच्या सावटाखाली वावरत आहेत. यावरून जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे.परंतु तुर्त, तरी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी लॉकडाऊन केले जाणार नसल्याचे जाहीर केले आहे.

लूॅकडाऊन लागणार नसले, तरी रस्त्यावरील नियम अत्यंत कडक करणार असल्याचे डॉ. इटनकर यांनी नमूद केले होते. त्यानुसार महापालिका, नगरपालिका व ग्रामपंचायत स्तरावर अधिकार्‍यांच्या नेमणुका केल्या आहेत. त्यानुसार पोलिसांचे जिल्ह्यात 50 ठिकाण निश्चित केले आहेत. यामध्ये नांदेड शहरात 20 व ग्रामीण भागात 30 आहेत. तसेच 25 तपासनाके ठेवण्यात आले आहेत. प्रत्येक ठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला, असून नियमांचे पालन न करणार्‍यांची गय करू नका असे आदेशित केले आहे. अशी माहित पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी दिली.

घराबाहेर पडताना नागरिकांना चेहर्‍यावर मास्क लावणे, दुचाकीवर एकटे प्रवास करणे, तीन चाकी व चारचाकी वाहनामध्ये तीन जणांशिवाय अधिक असतील, दंड लावला जात आहे. पोलिसांनी नियमभंग करणार्‍यांना चांगलाच हिसका दाखवायला सुरुवात केली आहे. या कामाचा पोलिसांवर ताण येत असला, तरी नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यास कोरोनाची साखळी तोडण्यास मदत होऊ शकते, असे पोलिस अधीक्षक विजयकुमा मगर यांनी सांगितले.