नांदेड, बातमी24ः- नांदेड जिल्ह्यात कोरोनामुळे होणार्या मृत्यूचा आकडा दिवसेदिवस वाढत आहे. मागच्या चौविस तासांमध्ये 6 जणांना कोरोनाच्या संसर्गापुढे प्राण सोडले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या 103 एवढी झाली, असून मागच्या काही दिवसांमध्ये दिवसाकाठी सरासरी चार ते पाच जणांचा मृत्यू होत आहे.
बुधवार दि. 5 ऑगस्ट रोजी 933 नमून तपासण्यात आले. यामध्ये 699 निगेटीव्ह आले, तर 196 नमून्यांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. यामध्ये आरटी-पीसीआर तपासणीमध्ये 106 तर अंटीजन किटव्दारे करण्यात आलेल्या चाचणीमध्ये 89 जण कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 2 हजार 692 इतकी झाली आहे.
आरटी-पीसीआर चाचणीत सर्वाधिक रुग्ण हे नांदेड शहरातील 23, देगलूर-18, मुखेड-18, हदगाव-10, तर अंटीजन चाचणीमध्ये नांदेड शहरातील 63 रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आले. बुधवारी 75 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 1 हजार 132 झाली आहे. आजघडिला 1 हजार 444 रुग्णांवर उपचार सुरु असून त्यातील 57 रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. यात 37 महिला व 19 पुरुषांचा समावेश आहे.
——-
सहा जणांचा मृत्यू
नायगाव येथील 50 वर्षीय महिलेचा दि. 4 रोजी, मुदखेड शहरातील साठेनगर भागात राहणार्या 61 वर्षीय पुरुषाचा दि.4 रोजी,किनवट तालुक्यातील इस्लामपुरा येथील 60 वर्षीय पुरुषाचा दि. 4 रोजी, लोहा शहरातील शिवाजी चौकातील 74 वर्षीय पुरुषाचा दि. 5 रोजी,नांदेड तालुक्यातील वाघी रोडवरील 52 वर्षीय पुरुषाचा दि. 5 रोजी तर नांदेड येथील शिवदत्त नगर भागात राहणार्या 64 वर्षीय पुुरुषाचा दि. 6 रोजी मृत्यू झाला. हे सर्व रुग्ण शासकीय रुग्णालयात उपचार घेत होते.