मागच्या चौविस तासात नऊ जणांचा मृत्यू

नांदेड

 

नांदेड,बातमी24:- नांदेड जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या व मृत्यूचा आकडा थांबण्याचे नाव घेत नसून मागचया 24 तासांमध्ये 9 जणांचा मृत्यू झाला आहे. नऊ पैकी दोन रुग्ण हे परभणी जिल्ह्यातील रहिवासी आहेत.

यात बिलोली तालुक्यातील 79 वर्षीय पुरुषाचा 31 रोजी मृत्यू झाला,भोकर येथील 65 वर्षीय पुरुष 31 रोजी दगावला,हदगाव येथील 56 वर्षीय पुरुषाचा दि.31,शहरातील परवाना नगर येथील 65 वर्षीय पुरुष,विठ्ठल नगर 69 वर्षीय, देगलूर तालुक्यातील 50 वर्षीय पुरुष, तर एक रुग्ण गंगाखेड व एक परभणी शहरातील असून त्याचा मृत्यू उपचारा दरम्यान नांदेड येथे झाला आहे.
—–
आजच्या आकडेवारीकडे लक्ष
रविवारी कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली होती.तबबल 301 नवे रुग्ण सापडले होते.आजच्या आकडेवारीकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.