लातूर जिल्हा परिषद पॅटर्न नांदेड जिल्हा परिषद राबविणार

नांदेड

 

नांदेड,बातमी24:-जे कर्मचारी आपल्या माता-पित्यास सांभाळत नाहीत,अशा कर्मचाऱ्यांचे 30 टक्के पगार कपात त्यांच्या आई वडिलांच्या खात्यात जमा करावी,यावर जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती बैठकीत एकमत झाले, यासंबंधी ठराव सर्वसाधारण सभेत घेतला जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष मंगराणी अंबुलगेकर यांनी दिली.

जिल्हा परिषद स्थायी समिती बैठक दि.23 रोजी झाली.यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष मंगराणी अंबुलगेकर, उपाध्यक्ष पद्मा रेडी,सीईओ वर्षा ठाकूर, सभापती संजय बेळगे,सभापती सुशीला बेटमोगरेकर,बाळासाहेब रावनगावकर यांच्यासह समिती सदस्य व विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.

बैठकीच्या सुरवातीला गैर हजर अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश दिले. काही सदस्यांनी जे कर्मचारी आपल्या आई वडील यांना सांभाळत नाही,अशा कर्मचाऱ्यांचे 30 टक्के पगार कपात करून त्यांच्या आई वडिलांच्या खात्यावर जमा करावी,अशी मागणी करण्यात आली,यास सकारात्मक विचार करण्यात आला,असून पुढील सर्व साधारण सभेत ठराव घेतला जाणार आहे.

कोरोनाचा वाढता प्रभाव कमी करण्यासाठी चाचण्या वाढविण्याचे आदेश यावेळी देण्यात आले. घरकुल योजनेसाठी रेती मिळत नसल्याने अडचणी येत आहेत, याबाबत जिल्हाधिकारी यांना कळविण्याच्या सूचना देण्यात येणार असल्याचे मंगराणी अंबुलगेकर यांनी सांगितले.