नागरिकांच्या बेशिस्तपणामुळे लॉकडाऊन करावे लागले- जिल्हाधिकारी डॉ. इटनकर

नांदेड

नांदेड, बातमी24ः जिल्ह्यात लॉकडाऊन हे येथील नागरिकांच्या बेशिस्तपणामुळे करावे लागले आहे. असे मत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी व्यक्त केले. ते एका स्थानिक वृत्त वाहिनीला मुलाखत देताना बोलत होते.

डॉ. इटनकर म्हणाले, की लॉकडाऊन वाढवायचे की थांबवाये याचा निर्णय अद्याप तरी घेतला नाही. लॉकडाऊन यशस्वी झाला किंवा अपयशी पडला, याचा निर्णय घेण्याची ही वेळ नाही. त्यास वेळ लागतो.सध्या येणारे रूग्ण हे मागच्या काळातील आहेत. त्यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये लॉकडाऊनच्या निर्णयावर बोलणे योग्य राहिल, असे डॉ. इटनकर यांनी सांगितले.परंतु लॉकडाऊन जाणीवपूर्वक घेतला गेलेला नाही. पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या कमी करण्याचा उद्देश आहे.

नागरिकांनी स्वतःहून काळजी घेतली, तर शिवाय घरातील पन्नास वर्षांवरील काळजी घेतल्यास मृत्यूदर कमी होईल, तरी काही लक्षणे आढळून आल्यास प्रशासनाशी संपर्क साधावा, वैद्यकीय टीम सेवेसाठी येऊन जाईल, वेळेत उपचार घेतले, तर दहा दिवसांमध्ये रुग्ण बरा होऊन घरी जात असल्याचे डॉ. इटनकर म्हणाले.

नागरिकांच्या बेशिस्तपणामुळे लॉकडाऊन करावे लागले. लॉकडाऊन संदर्भात प्रशासन मुडमध्ये नव्हते. आर्थिकदृष्टया सक्षम लोकांची काळजी नाही.परंतु ज्यांचे पोट रोजंदारीवर आहे. त्यांचा प्रश्न आहे. अशांना शासन राशन देत आहे. काम करून पोट भरतात. तरी लोकांमधील गांभीर्य आले की नाही, याबाबत विचार करून निर्णय घेऊ असे इटनकर यांनी सांगितले.