लॉकडाऊन परिणाम; 24 तासात रुग्णसंख्या घटली

नांदेड

नांदेड, बातमी24ः- सोमवारपासून जिल्ह्यात लॉकडाऊन सुरु करण्यात आले आहे. याचा परिणाम गुरुवारपासून दिसायला लागला, असून मागच्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या चाळीशीपार जात असताना गुरुवारी मात्र नवे अकरा रुग्ण सापडले तर 27 रुग्ण घरी परतले आहेत. तर एका 63 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.

गुरुवारी प्राप्त झालेल्या 219 नमून्यांपैकी 186 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. यात 11 स्वॅबचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे कोरेानाच्या रुग्णांची संख्या 743 इतकी झाली आहे. यात वाजेगाव येथील 63 वर्षीय महिलेचा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 40 झाली. राजरोजी 27 रुग्ण बरे झाल्याने 439 वर पोहचले आहेत. तर उपचार घेणारे रुग्ण हे 264 झाले आहेत.


——–
11 रुग्णांचा तपशीलवार

पत्ता—————-स्त्री/पुरुष——-वय

1) वाजेगाव, नांदेड——पुरुष———40

2)विकास नगर,कंधार—-पुरुष———24

3)सिद्धार्थ नगर, किनवट–पुरुष———38

4)सिद्धार्थ नगर, किनवट–स्त्री———-50

5)भायेगावरोड, देगलूर—-पुरुष———60

6) गोजेगाव, देगलूर——पुरुष——–29

7) बापु नगर,देगलूर——-स्त्री——–32

8)बापु नगर, देगलूर——स्त्री———65

9)मुक्रमाबाद, मुखेड—–पुरुष———44

10) अशोक नगर, मुखेड–पुरुष———55

11) मोंढा, लोहा——-स्त्री———–72
——–