किनवट तालुक्यातील पर्यायी पुल वाहुन गेल्याने अनेक गावांचासंपर्क तुटला

नांदेड

किनवट, बातमी24ः- किनवट माहूर तालुक्यात मागच्या चौविस तासात झालेल्या अतिवृष्टीमुळे किनवट तालुक्यातील घोटी येथील पर्यायी पुल वाहून गेला आहे. त्यामुळे माहूर तालुक्यातील तेलंगणा राज्यातील आदिलाबाद जिल्ह्यताील काही गावांचा संपर्क तुटला.

किनवट तालुक्यातील सर्वच्या सर्व मंडळात रात्रीतून चांगल्या पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये किनवट-62, इस्लापुर-56, मांडवी-22, बोधडी-44, दहेली-24, जलदरा-52 तर शिवणी मंडळात 92 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. शिवणी शिवारात झालेल्या अतिवृष्टीमुळे घोटी येथे तयार करण्यात आलेला घोटी वाहून गेला आहे.

सदरचा पर्यायी पुल असून राष्ट्रीय महामार्गाचे काम चालू असून तात्पुरत्या स्वरुपातत शारदा कंस्ट्रक्शन कंपनीने हा पुल तयार केला आहे. या पुलाचे काम निकृष्ट केल्याने पुल वाहून गेला असल्याचे या भागातील नागरिकांचे म्हणणे आहे. निकृष्ट कामाचे पितळ उघडे पडले आहे. सदैवाने यात जिवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात आले.