नांदेड,बातमी24:आपल्या शांत,संयमी आणि मितभाषी स्वभावाने ज्याची अल्पवधीत जिल्ह्याला परिचय झाला असे नांदेड जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्यासाठी ही नांदेड येथील कारकीर्द ही आयुष्यभर स्मरणीय ठरणार आहे,त्याचे कारण ही तसेच आहे.आज राऊत दांपत्यास कन्यारत्न प्राप्त झाले.कुटूंबातील पहिली बेटीच्या जन्माचे स्वागत ही आनंदाची पर्वणी ठरली आहे.विशेषतः या कन्येचा जन्म हा नांदेड येथील शाम नगर शासकीय महिला व बाल रुग्णालयात झाला. तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांच्या सुद्धा कन्यारत्नेचा जन्म हा याच रुग्णालयात झाला होता.
सहा सहा महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी म्हणून जळगाव येथून आलेल्या अभिजित राऊत हे आपल्या टू द पॉइंट अशी कामाची ओळख आहे.कमी बोलणे आणि काम प्रमाणिकपणे करणे हा त्यांचा सेवा स्वभाव आहे. त्यांच्या कुटूंबातील पहिल्या आपत्याचा जन्म ही नांदेडमध्ये बुधवार दि.4 रोजी सकाळी सहा वाजता झाला असून आई व बाळाची तबियत ठणठणीत आहे. कन्येचे वजन ही साडे तीन किलो भरले आहे.
डॉ.इटनकर दांपत्यास दोन वर्षापूर्वी नांदेड येथेच कन्यारत्न जन्मास झाली होती.विशेषतः त्यांच्या ही पत्नी डॉ.शालिनी इटनकर यांची प्रसूती ही शामनगर येथील शासकीय रुग्णालयात झाली होती.शासकीय रुग्णालयात पत्नीची प्रसूती घडवून आणल्याबद्दल त्यावेळी डॉ.इटनकर दांपत्याची व डॉ.विपीन इटनकर यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक ठरले होते. सलग दोन आजी माजी जिल्हाधिकारी यांना त्याच शासकीय रुग्णालयात कन्यारत्न जन्माचा चांगला योग घडला आहे.
हाच कित्ता जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी त्यांच्या पत्नीची प्रसूती शासकीय रुग्णालयात करवून घेत,शासकीय रुग्णालयाबदल सामान्य जनतेमध्ये एक चांगला संदेश दिला आहे.निरोप समारंभाच्या भाषणात बोलताना डॉ.इटनकर म्हणाले होते,की माझ्या मुलीच्या जन्मामुळे या नांदेडशी आयुष्यभराची नाळ आणि आठवण जुळली आहे.त्याच प्रमाणे डॉ. इटनकर यांच्याप्रमाणे अभिजित राऊत यांनी सुद्धा नांदेड येथे कन्यारत्न झाल्याने नांदेडशी भावनिक नाते जोडले जाणार आहे.