नांदेड,बातमी24:- राज्यातील तीन मंत्री कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर नांदेड दक्षिणचे काँग्रेस आमदार कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. रात्री उशिरा संबंधित आमदाराचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नांदेडचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री हे।मागच्या महिन्यात कोरोना पॉझिटिव्ह आले होते.त्यानंतर याच आठवड्यात माजी महापौर व त्याचे पुत्र नगरसेवक हे कोरोना पॉझिटिव्ह आले होते.या नगरसेवकाच्या संपर्कात आल्याने नांदेड दक्षिणचे आमदार हे कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.
शुक्रवारी सायंकाळनंतर अकरा वाजेपर्यंत 17 अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले. तर एकाचा मृत्यू झाला होता.रात्रीतून काही नमुने तपासले असता,यात नांदेड दक्षिणचे आमदाराचा सुद्धा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.अशोक चव्हाण यांच्यानंतर त्यांच्या पक्षातील एक माजी महापौर,नगरसेवकानंतर आता त्याच पक्षाचा आमदार पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. कोरोनाच्या काळात या आमदार मोहद्यांनी गरिबांना मदत करण्याचे काम युद्ध पातळीवर केले होते.