नांदेड, बातमी24ः भारतीय पोलिस सेवेतील 22 अधिकार्यांच्या बदल्यांचे आदेश निघाले, असून पोलिस अधीक्षक म्हणून पदस्थापना देण्यात आली. यामध्ये गँग ऑफ खंडणी,गँग ऑफ पिस्टल, गँग ऑफ अंडरवारचे कंबरडे मोडणारे नांदेडचे पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांच्या सुद्धा बदली समावेश आहे. मगर यांच्या जागी पोलिस अधीक्षक म्हणून ठाणे येथे पोलिस उपायुक्त असलेले प्रमोद शेवाळे हे नांदेडचे पोलिस अधीक्षक असणार आहेत.
तेरा महिन्यांपूर्वी पोलिस अधीक्षक संजयकुमार जाधव यांच्या जागी बदलीने आलेल्या विजयकुमार मगर यांनी पोलिस अधीक्षक म्हणून रुजू झाल्यानंतर नांदेड शहरातील गँगवार संपविण्याचा विडा हाती घेतला, येथील पॅप्युलर गँगला संपविण्याचे काम केले. जवळपास सत्तर जणांना बेडया घातल्या, तर एकाचा एन्काउंटर केला, तसेच एकाच गोळी घालून अपहरण केलेल्या मुलांची सुटका केली.
पोलिस अधीक्षक म्हणून विजयकुमार मगर यांची कामगिरी चांगली असताना सुद्धा अधून-मधून त्यांच्या बदलीची चर्चा सतत सुरु राहायची, मगर हे स्थानिक राजकारणामुळे बदलीच्या प्रयत्नात असल्याची चर्चा सुद्धा जोर धरत असताना मगर यांच्या जागी ठाणे उपायुक्त असलेल्या प्रमोद शेवाळे यांच्या बदलीचे आदेश नांदेड पोलिस अधीक्षक म्हणून प्राप्त झाले आहेत. मात्र विजयकुमार मगर यांच्यासह दहा ते पंधरा पोलिस अधीक्षकांना पदस्थापना देण्यात आलेली नाही, अशा अधिकार्यांना अंधातरी ठेवण्यात आले आहे.