नांदेड, बातमी24ः राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जिल्हा परिषदेच्या कोरोडो रुपयांचा निधी कसा काय परत गेला, यासंबंधी विचारणा केली,असता या वेळी नव्या पदाधिकार्यांनी जुन्या पदाधिकार्यांवर खापर फ ोडून मोकळे झाले. पाालकमंत्री चव्हाण यांनी सर्व विभागांचा पदाधिकार्यांकडून सर्वकक्ष आढावा घेत जबाबदारीने कामे करण्याचा सूचना दिल्या.
राज्य सरकारने शासनाच्या विविध विभागाकडे अखर्चित असलेला निधी परत करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार नांदेड जिल्हा परिषदकडील मागच्या दोन ते तीन वर्षांपासून अखर्चित असलेलेे ऐंशी कोटी रुपयांहून अधिक रक्कम राज्याच्या अर्थ विभागाकडे परतली आहे. यावरून जिल्हा परिषदेत खळबळ उडाली होती. शिवाय पदाधिकारी विरुद्ध अधिकारी मोठी बोंबाबोब उडाली होती.
जिल्हा परिषदेचा कारभारावर यावरून प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. कोरोनावर मात करून महिनाभराने नांदेडला परतलेल्या अशोक चव्हाण यांनी रविवारी सायंकाळी सर्व पदाधिकारी व प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकार्यांना बोलवून निधीबाबत विचारणा केली. या वेळी पदाधिकार्यांकडून व डॉ. शरद कुलकर्णी यांच्याकडून आढावा घेत कामात सुधारणा करा, प्राप्त निधीतून विकास कामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
——
आमदार जवळगावकर यांच्याव अप्रत्यक्ष निशाना
जिल्हा परिषदेच्या विद्यमान पदाधिकार्यांनी निधी परत जाण्यास तत्कालीन पदाधिकारी व नियंत्रण ठेवणारे नेते कारणीभूत असल्याचा ठपका ठेवला. यात आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्यावर अप्रत्यक्ष निशाना साधला गेल्याचे समजते.