नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्ण संख्येत मागच्या काही दिवसांमध्ये झपाट्याने वाढ होत चाललेली आहे.रविवारी आलेल्या अहवालात तब्बल 229 नवे रुग्ण सापडले आहेत. तर एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
रविवार दि.7 रोजी 1हजार 369 नमुने तपासण्यात आले.यात 1 हजार 109 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 229 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले. यात आरटीपीसीआर चाचणीत 98 तर अँटीजनमध्ये 131 जणांचा समावशे आहे. तसेच किनवट येथील 78 वर्षीय वृध्द व्यक्ती मरण पावली. त्यामुळे आतातपर्यंत कोरोनामुले 606 जणांचा मृत्यू झाला.
गत वर्षेभराच्या काळात 24 हजार 538 जण बाधित झाले.त्यातील 22 हजार 818 जणांनी या ससर्गावर मात केली. सध्या 899 जणांवर उपचार सुरू आहेत,यातील 22 जनांची प्रकृती गंभीर आहे.