रुग्ण वाढीचा वेग कायम;मृतांचा आकडाही कायम

नांदेड

नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस धक्के देणारी ठरत असून रविवार दि.11 रोजी 1 हजार 859 नवे रुग्ण आढळले तर 27 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तसेच 230 जण हे मृत्यूशी झुज देत आहेत.

नांदेड जिल्ह्यात मागच्या 24 तासांमध्ये 6 हजार 679 तपासण्या करण्यात आल्या.यता 4 हजार 665अहवाल निगेटिव्ह आले. तर 1 हजार 879 जणांचे अहवाल कोरोना बाधित आले. आरटी पीसीआर चाचणीत 857 तर अँटीजनमध्ये 1 हजार 02 रुग्णांचा समावेश आहे.त्यामुळे आतापर्यंत एकूण बाधित रुग्णांची संख्या 57 हजार 610 एवढी झाली,यातील 43 हजार857 जणांनी कोरोनावर मात केली.यात आजच्या कोरोना मुक्त झालेल्या 1 हजार 135 जणांचा समावेश आहे.

आज 27 जणांचा मृत्यू झाला.यामध्ये 9 महिला व 18 पुरुषांचा समावेश आहे.यात 38 वर्षीय पुरुषाचा सुद्धा यात नोंद आहे. 12 हजार 382 जणांवर सध्या उपचार सुरू असून यातील 230 जणांची प्रकृती अतिगंभीर आहे.