हिमायतनगर येथील रुग्ण संशयित; घाबरू नका,काळजी घ्या;जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिंदे यांचे आवाहन

नांदेड

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यात मागच्या दीड महिन्यात 303 जण हे विदेशातून आले आहेत.यात दक्षिण आफ्रिकेतुन हिमायतनगर येथे आलेल्या तीन जणांचा समावेश असून हे तिघा जणांचा अहवाल कोरोना पँझिटिव्ह आला असून पुढील खबरदार म्हणून या तिघांचे नमुने पुणे येथे ओमीक्रोन चाचणी करण्यासाठी पाठविण्यात आले आहे.त्यामुळे अहवाल आल्यानंतर सर्व बाबी निष्पन्न होतील. तूर्त अफवांवर विश्वास न ठेवता भीती बाळगण्याचे कारण नसून काळजी घेणे आवश्यक असल्याचे आवाहन जिल्हा परिषद जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बालाजी शिंदे यांनी केले.

कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेला ओमीक्रोन या विषाणूमुळे जगभर आमंत्रण मिळाले,असून या संदर्भात जगभर काळजी घेतली जात आहे,या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन सर्वत्र खबरदारी घेत असून विदेशातून येणाऱ्या नागरिकांवर विशेष लक्ष दिले जात आहे. आतापर्यंत 303 जण विदेशातून नांदेड जिल्ह्यात आले आहेत. या सर्वांची तपासणी केली असून लक्षणे असणाऱ्यांना विलगीकरणं करून त्यांना सोडण्यात आले असल्याचे डॉ. शिंदे यांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेतून हिमायतनगर येथे आलेल्या तिघा जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले असल्याने ओमीक्रोन बाबत नमुने तपासणीसाठी पुणे येथील राष्ट्रीय प्रयोगशाळा येथे पाठविण्यात आले असून पुढच्या काही दिवसांमध्ये अहवाल येणार असून त्यानंतर स्पष्ट होणार आहे,असे डॉ.बालाजी शिंदे यांनी सांगितले. मात्र नागरिकांनी घाबरण्याचे कारण नसून कोरोनाच्या नियमांचे पालन करावे, सोबत लसीकरणाचे दोन्ही लस घेऊन स्वतःला सुरक्षित करण्याचे आवाहन डॉ. शिंदे यांनी यावेळी केले.