रुग्णसंख्या दोनशे;तीन जणांचा कोरोनामुळे मृत्यू

नांदेड

 

नांदेड, बातमी24:- आज आलेल्या अहवालात कोरोनाने बाधित झालेल्या रुग्णांची संख्या 196 आली आहे,तर तीन जण हे कोरोनाच्या संसर्गामुळे मरण पावले आहेत.

गुरुवार दि.1 सप्टेंवर रोजी आलेल्या अहवालात 828 जणांची चाचणी करण्यात आली,यात 626 अहवाल निगेटिव्ह तर 196 अहवाल कोरोना बाधित आले आहेत.त्यामुळे जिह्यातील बाधित रुग्णांची संख्या 15 हजार 901 एवढी झाली आहे.आज 222 रुग्ण हे बरे झाल्याने 12 हजार 175 जण कोरोना मुक्त झाले,असून सध्या 3 हजार 246 उपचार घेत आहेत.तर 54 जण हे मृत्यूच्या दाढेत आहेत.
——-
भोकर येथील 72 वर्षीय पुरुषाचा दि.30 रोजी मृत्यू झाला.मुखेड येथील 55 वर्षीय पुरुषाचा दि.30 रोजी तर नांदेड शहरातील 72 वर्षीय पुरुषाचा दि.1 रोजी मृत्यू झाला.त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या 406 झाली.