नांदेड, बातमी24ः- कोविड-19 प्रतिबंधनात्मक उपाय-योजनांच्या अनुषंगाने कोरोना पॉझिटीव्ह असूनही लक्षणे विहरीत अशा रुग्णांना खासगी रुग्णालयात भरती करून घेऊ नये, अशा रुग्णांना औषधोपचार व सुविधा कोविड केअर सेंटर येथे करण्यात येणार आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली.
जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी आय.एम.ए अध्यक्ष यांना उद्देशून लिहलेल्या पत्रात म्हटले, की नांदेड जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. सदरच्या रुग्णांना अत्यावश्यक औषधोपचार व वैद्यकीय उपाययोजनांचा भाग म्हणून जिल्ह्यतील कोणत्याही खासगी रुग्णालयांमध्य लक्षणे नसलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांना भरती करून घेऊ नये, अशा रुग्णांचा औषधोपचार जिल्हा शल्यचिकित्सकांच्या देखरेखी खालील कोविड केअर सेंटरमध्ये करण्यात येणार असल्याचे डॉ. इटनकर यांनी कळविले आहे.