पावणे दोनशे जणांची मृत्यूशी झुंज

नांदेड

नांदेड, बातमी24ः नांदेड जिल्ह्यात कोरोनाच्या गंभीर रुग्णांची संख्या चिंतेचा विषय ठरत आहे. जिल्ह्यात 169 गंभीर रुग्ण हे मृत्यूशी झुंज देत आहेत. तर मागच्या चौविस तासात 99 नवे कोरोनाचे रुग्ण सापडले आहे. तसेच तीन रुग्णांचा कोरोनोच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.

मागच्या महिनाभराच्या काळात नांदेड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या तीन हजाराच्या पार गेली आहे. बुधवार दि. 12 ऑगस्ट रोजी 610 जणांचा अहवाल प्राप्त झाला आहे. यात 491 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. तर 99 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. यात आरटी-पीसीआर चाचचणीत 62 तर अंटीजन चाचणीत 37 जण कोरोना पॉझिटीव्ह आले. त्यामुळे कोरोनाच्या रुग्णांची एकूण रुग्ण संख्या 3 हजार 617 एवढी झाली आहे.

दिवसभराच्या काळात 147 जणांची कोरोनातून मुक्तता झाली आहे. आतापर्यंत कोरोनामुक्त झालेले रुग्ण हे 2 हजार 56 एवढे आहेत. तर बुधवारच्या प्रेसनोटमध्ये तीन जणांच्या मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. यामध्ये देगलूर नाका येथील एका 75 वर्षीय पुरुषाचा दि. 10 रोजी मृत्यू झाला. किनवट तालुक्यातील लोणी येथील 60 वर्षीय महिलेचा दि. 12 मृत्यू झाला. तसेच देगलूर येथील लाईन गल्ली येथील 50 वर्षीय महिलेचा दि. 12 रोजी मृत्यू झाला.
——-
तालुकानिहाय रुग्ण संख्या
नांदेड मनपा क्षेत्र-18, लोहा-1, नायगाव-8, बिलोली-1, कंधार-1, दिल्ली-1, नांदेड ग्रामीण-4, मुखेड-18, उमरी-1, हदगाव-5, धर्माबाद-3, यवतमाळ-1 तर अंटीजन चाचणीत मुखेड-6, भोकर-3, मुदखेड-11, धर्माबाद-4, नांदेड ग्रामीण-3, देगलूर-8 व उमरी येथील 2 असे एकूण 99 रुग्णांचा समावेश आहे.