नांदेड,बातमी24:- शिवाजी नगर भागात झालेल्या धगडफेकीमधील आरोपीना न्यायालयात हजर करण्यात आले होते.यातील काही आरोपींना एम सी आर देण्यात आला.यावेळी जमवाची पोलिसांसोबत झालेल्या बाचाबाची झाली.या बाचाबाची रूपांतर झटापटीत झाले. ही संधी साधत गाडीमधील दोन आरोपी गाडीमधून फरार झाले.ही झटापट शिवाजी नगर भागातील नगरसेवक नातेवाईक व त्यांच्या सोबत असलेल्या जमावात झाली.या सगळ्या प्रकारचे चित्रण दोन्ही बाजूने करण्यात आले. त्रिपुरा येथील घटनेचे पडसाद नांदेड येथे उफाळून आले होते. त्यावेळी पोलिसांना जमावाच्या दगडांचा मार झेलावा लागला होते.या घटनेची शाही वाळते न वाळते थेट जमावाने न्यायालयसमोरच पोलिसांसोबत झटापट करत दादागिरिचा कळस गाठला.
दि. 13 नोव्हेंबर रोजी शिवाजी नगर भागातील दगडफेकीच्या घटनेनंतर झालेल्या पोलिसांकडून कोंबिंग ऑपरेशन करण्यात आले होते.या घटनेनंतर आरोपींना न्यायालय हजर केले जात असून यातील एक आरोपी शेख अनिस शेख समीद यास न्यायालयाने एम सी आर दिला.त्याचसोबत काही आरोपीना पोलीस वजीराबाद पोलीस ठाण्यात घेऊन जात असताना जमावाने गाडीसमोर येऊन पोलिसांसोबत बाचाबाची सुरू केली. यावेळी दोन्ही बाजूने वाद पेटत गेला.पोलीस आणि जमावामध्ये सुरू असलेली वादावादी संधी गाठत दोन जण गाडीमधून पळून गेले.
यावेळी पोलिसांमध्ये व जमावत चांगलीच झटापटी झाली.त्यानंतर पोलिसांनी गाडी सरळ वजीराबाद पोलीस ठाण्यात गेली.यावेळी पोलीसाकडून एकास जेलममध्यें रवानगी केली.या घटनेचा मागोवा घेण्यासाठी काही पत्रकार मंडळी गेली असता,पोलिसांकडून मौन पालन करण्यात आले. सदरची घटना न्यायालयासमोर शेकडो लोकांच्या साक्षीने घडल्याचे बघायला मिळाले.पोलिसांना जमावाकडून मारहाणीच्या घटनेत वारंवार वाढ होत आहे.
Nice post