प्रवीण पाटील चिखलीकर उपचारास बाहेर जाणार; कुटुंबियातील सदस्यांचे अहवाल निगेटीव्ह

नांदेड

नांदेड, बातमी24ः भाजपाचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे चिरंजीव प्रवीण पाटील चिखलीकर यांचा अहवाल नुकताच कोरोना पॉझिटीव्ह आला होता. त्यांची प्रकृतीस्थिर असली, तरी पुढील उपचारासाठी मुंबई किंवा औरंगाबाद येथे हलविण्यात येणार आहे. तसेच प्रवीण पाटील चिखलीकर यांच्यानंतर त्यांच्या कुटुंबियातील सदस्यांची चाचणी घेण्यात आली.यात सर्वांचे अहवाल निगेटीव्ह आले असल्याचे त्यांच्या निकटवृत्तीयांकडून सांगण्यात आले.

जिल्हापरिषद सदस्य प्रवीण पाटील चिखलीकर हे मुंबई येथे गेले होते. रविवारी नांदेड येथे परतल्यानंतर सायंकाळी त्यांनी अ‍ॅटीजन किटव्दारे चाचणी केली, असता त्यात त्यांचा अहवाल कोेरोना पॉझिटीव्ह आला होता. आजमितीस त्यांच्यावर पावडेवाडी नाका भागातील आशा नामक एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. डॉक्टरांच्या सल्याने प्रवीण पाटील चिखलीकर यांना मुंबई किंवा औरंगाबाद येथे उपचारासाठी पाठविण्यात येणार असल्याचे निकटवर्तींयाकडून सांगण्यात आले.