विविध विभागातील 167 अधिकारी-कर्मचा-यांच्‍या पदोन्‍नत्‍या;सीईओ ठाकूर यांचा महत्वपूर्ण निर्णय

नांदेड

नांदेड,बातमी24:- नांदेड जिल्‍हा परिषदे अंतर्गत विविध संवर्गातील 167 अधिकारी- कर्मचा-यांना पदोन्‍नत्‍या देण्‍यात आल्‍या आहेत. जिल्‍हा परिषदेच्‍या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती पद्मा नरस्सा रेड्डी सतपलवार, शिक्षण व बांधकाम सभापती संजय बेळगे, महिला व बालकल्याण सभापती सुशिलाताई पाटील बेटमोगरेकर, समाजकल्याण सभापती रामराव नाईक, कृषी व पशुसंवर्धन विभागाचे सभापती बाळासाहेब रावणगावकर यांनी विविध विभागातील कर्मचा-यांना पदोन्‍नत्‍या देण्यासाठी पाठपुरावा केला. पदोन्‍नत झालेल्‍या अधिकारी-कर्मचाऱ्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आदेश दिले आहेत. यात सामान्‍य प्रशासन विभाग, आरोग्‍य विभाग, शिक्षण, पशुसंवर्धन व अर्थ विभागातील अधिकारी व कर्मचा-यांचा समावेश आहे.

सामान्‍य प्रशासन विभागात एकूण 23 अधिकारी कर्मचारी पदोन्‍नत झाले आहेत. 3 सहायक प्रशासन अधिका-यांना पदोन्‍नतीने कक्ष अधिकारी म्‍हणून पदस्‍थापना, 9 कनिष्ठ प्रशासन अधिका-यांना अधिक्षकपदी तर 11 कर्मचा-यांना वरिष्ठ सहायक पदावर पदोन्‍नती दिली आहे. अर्थ विभागातील 15 जणांना पदोन्‍नती दिली गेली. यामध्‍ये वरिष्‍ठ सहाय्यक लेखा संवर्गातून कनिष्‍ठ लेखाधिकारी संवर्गात 8 तर 7 जणांना कनिष्‍ठ लेखाधिकारी संवर्गातून लेखाधिकारी या संवर्गात पदोन्‍नती देण्‍यात आली आहे. पशुसंवर्धन विभागात 11 जणांना पशुधन पर्यवेक्षक संवर्गातून सहाय्यक पशुधन विकास अधिकारी या संवर्गात पदोन्‍नती देण्‍यात आली आहे. आरोग्‍य विभागातील 98 कर्मचा-यांना पदोन्‍नतीने आदेश देण्‍यात आले आहेत. यात आरोग्‍य सेवक (पुरुष) या संवर्गातून 44 जणांना आरोग्‍य सहाय्यक संवर्गात पदोन्‍नती देण्‍यात आली आहे. आरोग्‍य सेविकेतून 33 जणींना आरोग्‍य सहाय्यीका म्‍हणून पदोन्‍नती देण्‍यात आली तर 21 जणांना आरोग्‍य पर्यवेक्षक (विस्‍तार) म्हणून पदोन्‍नती देण्‍यात आली आहे. यात आरोग्‍य सहाय्यक 12 तर 9 आरोग्‍य सहाय्यीकांचा समावेश आहे.
शिक्षण विभागात आतापर्यंत 20 जणांना पदोन्‍नती देण्‍यात आली आहे. पदोन्‍नत प्राथमिक शिक्षकातून 10 जणांना कनिष्‍ठ विस्‍तार अधिकारी म्‍हणून तर 10 माध्‍यमिक शिक्षक व विस्‍तार अधिकारी यांना अ राजपत्रीत मुख्‍याध्‍यापक म्‍हणून पदोन्‍नती देण्‍यात आली आहे. तसेच आज शिक्षण विभागातील 171 शिक्षकांना उच्‍च श्रेणी मुख्‍याध्‍यापकांच्‍या पदोन्‍नतीसाठी समपुदेशने आदेश देण्‍यात येणार आहेत. आज उच्‍च श्रेणी मुख्‍याध्‍यापकांना पदोन्‍नतीने आदेश झाल्‍यास पदोन्‍नतीचा आकडा 338 होईल.

*चौकट- सिईओंनी केली आश्‍वासनाची पूर्तता; कर्मचा-यांत आनंदाचे वातावरण*
जिल्‍हा परिषदे अंतर्गत विविध विभागातील पदोन्‍तीच्‍या कोटयातील रिक्‍तपदे सेवाज्येष्‍ठतेनुसार जून महिन्‍यात भरण्‍याचे अश्‍वासन मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिले होते. त्‍यानुसार कर्मचा-यांना देण्‍यात येणा-या पदोन्‍नती संदर्भात त्‍यांनी विभागवार खाते प्रमुखांच्‍या वेळोवेळी बैठका घेतल्‍या. ब-याच दिवसांपासून प्रलंबित असलेल्‍या पदोन्‍नती विषयाकडे त्‍यांनी जातीने लक्ष घालून कर्मचा-यांना पदोन्‍नत्‍या देण्‍याच्‍या आश्‍वासनाची पूर्तता केली आहे. त्‍यामुळे संघटना व कर्मचा-यांनी प्रशासनाचे आभार मानले आहेत.