किनवट, बातमी24ः- जिल्ह्यात वाळू माफि यांनी हैदोस घातला आहे. महसूल विभागाच्या नाकावर टिच्चून वाळू उपसा व वाहतुक करणारे माफि या मंडळी पोलिसांची वर्दी फाडायला बसले आहेत. त्यामुळे किनवट तालुक्यात वाळू माफि यांनी शुक्रवारी रात्रीच्या सुमारास मारहाण करून जखमी केले आहे. वाळू माफि या पोलिसांवर हात उचलण्याचे धाडस करतात, कदाचित पोलिसांचे ही या अवैध धंदात काळे हात होत असावेत, अशी चर्चा तालुक्यात होत आहे.
किनवटपासून दक्षिणेस नऊ किलो मीटर अंतरावर असलेल्या दाभाडी येथील नदीवर वाळू उपसा होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून पोलिसांनी घटनास्थळी जाऊन कारवाई करण्याचा प्रयत्न केला, असता वाळू तस्करांनी पोलिसांवर लाठी-काटयांनी हल्ला चढविला. पोलिसांकडील मोबाईल काढून घेतले. या हल्ल्यात चार पोलिस कर्मचारी जखमी झाले, असून राठोड नामक पोलिस कर्मचार्यास गंभीर दुखापत झाल्याने नांदेड येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.
या घटनेची माहिती पोलिस निरीक्षक मारोती थोरात यांना देण्यात आल्यानंतर ते पथक घेऊन घटनास्थळी रवाना झाले. या वेळी वाळू तस्कारांनी थोरात यांना ही धक्काबुकी केली. त्यामुळे तालुक्यातील वेगवेगळया पोलिस ठाण्याच्या पोलिसांना घटनास्थळी पाचारण करावे लागले. या हल्ल्यात पोलिस कर्मचारी राठोड, गजानन चौधरी कोलबुद्धे हे जखमी झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांच्या फि र्यादीवरून वाळू तस्करांविरुद्ध गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरु होती.
—–
आतापर्यंत वाळू माफि यांकडून महसूली अधिकार्यांना हल्ले करताना महसूली अधिकार्यांना टार्गेट केले जात होते. किनवट येथील माफि यांनी पोलिसांना जबर मारहाण करून जखमी केल्याने पोलिसी वर्दीलाच आव्हान दिले आहे.