विष्णुपुरी धरणाचे सात दरवाज उघडले

नांदेड

नांदेड,बातमी24ः विष्णुपुरी धरणाच्या वरच्या भागात सततधार पाऊस पडत आहेत. तसेच जायकवाडी धरणाचे पाणी खाली सोडून देण्यात आल्याने शनिवारी सकाळपर्यंत सात दरवाजे उघडण्यात आले आहेत. या सातही दरवाज्यातून 2 हजार 244 क्सुसेसने पाण्याचा विसंर्ग सुरु आहे. त्यामुळे नांदेड व नदी काठच्या गावांमध्ये पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली, असून लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मागच्या आठ दिवसांपासून मराठवाडयात पाऊस सक्रिय झाला आहे. यापूर्वी विष्णुपुरी प्रकल्प शंभर टक्े भरलेला आहे. कालपासून ते शनिवारी सकाळी आठ वाजेपर्यंत सहा दरवाजे उघडण्यात आले होते. यातून 1 हजार 764 क्युसेस पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे गोदावरी नदी दुतोंडी भरून वाहत आहे. संभाव्य धोका पाहता, कालपासून नवाघाट व वसरणी पुलावरील वाहतुक बंद करण्यात आली आहे.
——–
मराठवाडा-विदर्भ संपर्क तुटला
मराठवाडयाच्या सिमेवरून वाहणार्‍या पैनगंगा नदीला ही मोठा पुर आला आहे इसापूर धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्याने परिस्थिती निर्माण झाली, असून नदी काठच्या परिसरातील हजारो हेक्टर जमिन पाण्याखाली गेली आहे. तसेच गांजेगाव येथील नदी पुलावरून काल सहा फु ट पाणी वाहत होते. त्यामुळे विदर्भ-मराठवाडा संपर्क तुटला होता.