शाहू महाराजांचा वैचारिक वारसा गतीमान करणार- इंजि. प्रशांत इंगोले

नांदेड

नांदेड, बातमी24ः- आरक्षण चळवळीचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांची चळवळ गतिमान करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष इंजि. प्रशांत इंगोले यांनी केले. नांदेड जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा कार्यालय व राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळयास जयंतीनिमित्ताने अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.

राजर्षि शाहू महाराज यांनी शंभर वर्षांपूर्वी बहुजन समाजाच्या उद्धारासाठी कठोर पावले उचलली. विषमतावादी व्यवस्थेविरुद्ध शाहू महाराजांनी एल्गार पुकारला, ही एक मोठी ऐतिहासिक क्रांती होती. त्यानंतरच्या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवला. हाच वारसा वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून नेटाने पुढे नेण्याचा निर्धार यावेळी इंजि. प्रशांत इंगोले यांनी व्यक्त केला.

या वेळी प्राचार्य विकास कदम, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव प्रा साहेबराव बेळे, जिल्हा सचिव के. एच. वने हातनीकर, जिल्हा प्रवक्ता संजय टिके, महेंद्र सोनकांबळे, पद्माकर सोनकांबळे, डॉ. संतोष वाठोरे, मारुती डोईबळे, धम्मदीप एंगडे, रवी पोटफोडे, ऋषिकेश शिवणीकर, सत्यपाल नरवाडे, अक्षय गजभारे, विजय जोंधळे, अमोल वाघमारे, कनिष्ठ सोनसळे आदी उपस्थित होते.