शाल-जोडे आणि चौकर-षटकाराने गाजली सर्व साधारण सभा

नांदेड

 

जयपाल वाघमारे
नांदेड,बातमी24:- नांदेड जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा ही निरोपाची सभा असावी,असे नूर आला.मात्र प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या भाषणाने सभा दिरंगभीर आणि त्यांच्या भाषणांतील फटकेबाजीने शाल जोडयांचा आहेर सत्ताधाऱ्यासह अधिकाऱ्यांच्या देणारी सुरूवातीला ठरली;परंतू चिखलीकर यांचे भाषण म्हणजे अध्यक्ष व सीईओ यांच्यावर आक्षेप घेणारे ठरले.यावर जिल्हा परिषद अध्यक्ष मंगाराणी अंबुलगेकर यांनी तितक्याच धडाकेबाज पद्धतीने चिखलीकर यांच्या भाषणांतील मुद्यांना सीमापार करत दमदारपणे चौकर आणि षटकारांची आतिषबाजी केली.त्यामुळे अधिक बोलण्याची जोखीम पत्करणाऱ्या प्रवीण पाटील चिखलीकर यांना सरतेशेवटी दारू पराभवाची चव चाखावी लागली.यात दोन्ही बाजूने झालेले चौकर-षटकारासोबतच एकमेकांवर उधलेला शाल जोड्यांचा आहेर आजच्या सभेचे वैशिष्ट्य ठरले.

जिल्हा परिषद सर्वसाधारण सभा सोमवार दि.29 रोजी यशवंतराव चव्हाण सभागृहात झाली. यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्ष मंगाराणी अंबुलगेकर, उपाध्यक्ष पद्मा रेडी, सीईओ वर्षा ठाकूर, सभापती संजय बेळगे, रामराव नाईक,सुशीला पाटील बेटमोगरेकर यांच्यासह सर्व विभागप्रमुख व सदस्यांच्या उपस्थिती होती.

सभेच्या सुरुवातीला निधन पावलेल्या प्रतिष्टित व नामांकित व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली.त्यानंतर मालेगाव यात्रेवरून चर्चेला जोर पेटला.यावरून चंद्रसेन पाटील यांनी पोटतिकडीने मालेगाव यात्रेचा विषय लावून धरला.यावर माणिक लोहगाव,दशरथ लोहबंधे आदींनी चंद्रसेन पाटील यांची बाजू लावून धरली.त्यानंतर प्रशासनाने शासनाची भूमिका सभागृहाला अवगत करून दिली. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये,यासाठी प्रशासन दक्ष असून शासनाच्या गाईडलाईनच्या विचार करता यावर निर्णय घेऊ असे आश्वासन मंगाराणी अंबुलगेकर व सीईओ वर्षा ठाकूर दिले.

सभेला उशिराने येणाऱ्या प्रवीण पाटील चिखलीकर यांनी मालेगाव यात्रेचा विषय पुन्हा सभागृहासमोर आणून प्रशासनास मालेगाव यात्रेचे महत्व पटवून दिले.यावेळी अध्यक्ष मॅडम व सीईओ आपणास लवकर प्रमोशन हवे असेल तर यात्रेस हिरवाकंदील द्यावा अन्याय बघा असे म्हणत सभागृहात हास्य पिकविला. प्रशासनाने एक लाख मास्क यात्रा ठिकाणी वाटप करावे, आणि नियमांचे पालन केले तर अशक्य काही नसल्याचे चिखलीकर यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.या वर्षांपासून मालेगाव यात्रा मानकरी यांना प्रत्येकी 51 हजार रुपये दिले जाणार असल्याचे सभागृहात जाहीर केले.

विजय धोंडगे यांनी शिक्षण विभागातील गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या पदोन्नतीच्या विषयावरून दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांची शाळा भरविली,शेवटी सीईओ यांना या विषयात मध्यस्थी करावी लागल्याने या विषयावर पडदा पडला.

जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेला खऱ्या अर्थाने कलाटणी मिळाली ती म्हणजे, पाणी पुरवठा विभागाचे तत्कालीन प्रभारी कार्यकारी अभियंता बारगळ यांच्या रजेच्या मुदावरून होय.चंद्रसेन पाटील यांनी बारगळ यांची माहिती दिली जावी,अशी मागणी केली,असता कार्यकारी अभियंता पाटील यांनी खासगी माहिती देता येत नसल्याचे सांगताच यावरून जोरदार वाद पेटला. या विषयावरून प्रवीण पाटील चिखलीकर यांनी अनेक धीर गंभीर विषयांना हात घातला.अधिकाऱ्यांची उडवा उडवी साडे नऊ वर्षे झाले ऐकत आलो आहे. जिल्हा परिषद अधिकाऱ्यांसाठी प्रयोगशाळा झाल्याने अधिकारी बेजबाबदारपणे वागतात आणि यावर पदाधिकारी मुगगिळून बसतात,असा थेट आरोप केला.आम्ही सभागृहात राजकारण करत नाही पण हे नियम पदाधिकारी पाळत नसल्याने सदस्यांना अधिकाऱ्यांचा अवमानाला तोंड द्यावे लागत असल्याचा मुद्दा अध्यक्ष व सीईओ यांच्या जिव्हारी लागला.एकतर्फी जिल्हा परिषद चालविली जात असल्याने दुजाभाव होणारा असून यापुढे मातेची भूमिका अध्यक्ष मंगाराणी अंबुलगेकर घ्यावी असे सांगत त्यांच्या कारभारावर आसूड ओढले.चिखलीकर या भाषणावरून सभागृहाचे वातावरण पूर्णतः बदलून गेले.
यानंतर सभागृह निरुत्तर झाल्याचे बघायला मिळाले.

चिखलीकर यांच्या भाषणाचा प्रतिकार करणार नाहीत,त्या अध्यक्ष मंगाराणी अंबुलगेकर गप्प राहणार कशा? अंबुलगेकर यांनी सडेतोडपणे चिखलीकर यांच्या भाषणांतील मुद्दे खोडून काढत, कोरोनाच्या काळात घरी न राहता रोज जिल्हा परिषदेला पूर्णवेळ थांबून काम केले,माझ्यासोबत सीईओ यांनी सुद्धा वेगवेगळे उपक्रम राबविले,अध्यक्ष म्हणून कारभार करताना माझ्याशिवाय माझ्या घरातील एकही मंडळी हस्तक्षेप करत नसल्याचे आवर्जून सांगितले.जिल्हा परिषद अध्यक्ष या नात्याने मी पूर्णपणे सक्षम असून माझ्या सर्व महिला भगिनी सुद्धा दमदारपणे सदस्य व पदाधिकारी म्हणून काम करत असताना आपल्या भाषणांतील संपूर्ण मुद्यांचे खंडन करत चिखलीकर यांच्या भाषणाचा खरपूस समाचार घेतला. सभागृहातील अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांचा दबलेला आवाज अंबुलगेकर यांनी जागा करत स्वतःची प्रतिमा आजच्या सभेत उंचावण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे चिखलीकर यांच्या भेदक माऱ्यांपुढे घायाळ झालेला पदाधिकारी-अधिकारी संघ अंबुलगेकर यांच्या तुफान भाषणबाजीने डावाची पलटी झाल्याचे बघायला मिळाले.