माळेगाव यात्रेची विविध कार्यक्रमांनी यशस्वी सांगता;यात्रेसाठी एक रुपयाही निधी न देणाऱ्या आमदार-खासदाराकडून अधिकाऱ्यांवर खापर

नांदेड

जयपाल वाघमारे

नांदेड, बातमी24: नुकतीच पार पडलेली माळेगाव यात्रा अधिकाऱ्यांना टार्गेट करणारी ठरली.त्या मतदार संघातील आमदार व खासदर मंडळींनी एक रुपया माळेगाव यात्रेला न देता अधिकाऱ्यांचे कान उपटण्याचे काम करून स्वतःला मिरवून घेतले.निधी शंभर टक्के जिल्हा परिषदेचा आणि लोकप्रतिनिधी कडून बदनामी मात्र अधिकाऱ्यांची असा प्रकार बघायला मिळाला. या परिस्थितीही अधिकाऱ्यांनी यात्रा चांगली करण्याची परंपरा कायम
राखली. तर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सहपत्नीस यात्रेला लावलेली हजेरी जिल्हा परिषद अधिकाऱ्यांचे मनोबल वाढविणारी ठरली

जिल्हा परिषदेवर असलेले प्रशासक राज शिंदे-फडणवीस सरकारमुळे कायम आहे.त्यामुळे अधिकाऱ्यांना आमदार व खासदार व अन्य लोकप्रतिनिधीच्या शाब्दिक हल्ला सोसावा लागत आहे. यावेळी पहिल्यादा माळेगाव यात्रा ही जिल्हा परिषद पदाधिकारीविना झाली. यात्रेचे सर्व नियोजन व विविध कार्यक्रम हे अधिकारी व त्यांचे कर्मचारी हे करत असतात.लोकप्रतिनिधी यांना मानपान हा इतकाच भाग असतो.यात्रेत भरणारे भव्य कृषी प्रदर्शन असो,किंवा विविध पशुस्पर्धा हे मुख्य आकर्षण असते,सोबत विविध विभाग स्टोल आणि मनोरंजनाची मेजवानी ही लावणी व लोककला महोत्सव असा परिपूर्ण कार्यक्रम असतो.

जिल्हा परिषदकडून या माळेगाव यात्रेवर 60 लक्ष रुपये खर्च केला जातो.सगळा निधी जिल्हा परिषद सेसमधून म्हणजे स्वतःच्या उत्पन्नातून होत असताना यावेळी त्या भागातील आमदार व खासदार यांनी एकमेकाच्या चढाओढीत यात्रा हायजॅक करण्याचा प्रयत्न केला.यांच्यातील मानपान नाट्य हे पोरकटपणा ठरवा अशी केविलवाणी बाब जिल्ह्याला बघायला मिळावी.यात खासदर यांनी थोडं नमतं घेत त्या भागाचे आमदार यांना थेट अंगावर न घेता दुर्लक्षित केलं.मात्र यांच्यातील कलगीतुरा इतर पक्षाच्या मंडळींसाठी मनोरंजन करणारा ठरला,असो.

अधिकाऱ्यांनी यात्रा यशस्वी करण्यासाठी महिनाभरा पासून मेहनत घेतली. पाण्यापासून ते दिवाबत्तीपर्यंत सर्व सुविधा देण्याचा प्रयत्न यात्रेत येणाऱ्या भाविक व व्यापारी यांना केला.तरी पण स्थानिक आमदार यांनी अधिकाऱ्यांना उद्देशून केलेले बोलबचत हे त्यांच्या अडाणी व आडमुठेपणाचे जाहीर प्रदर्शन करणारे ठरले.सीईओ सारख्या अधिकाऱ्यास ज्यांनी महिनाभर यात्रा चांगली व्हावी म्हणून नियमित माळेगाव येथे दौरे केले.त्यांचे उपटलेले कान हे सनदी अधिकारी राहिलेल्या त्या स्थानिक आमदार यांच्या तोंडचे शब्द असे असावे का असा प्रश्न पडल्याशिवाय राहिले नाहीत. यात्रेसाठी आमदार म्हणून काही निधीची तरतूद केली असती,तर अशी भावना असू शकते असे आपणास वाटले असते. केवळ यात्रा ताब्यात आणि स्वतःच्या दबावात घेण्यासाठी त्यांनी केलेली खटाटोप केविलवाणी ठरली.

या यात्रेच्या काळात सीईओ वर्षा ठाकूर यांची मसुरी येथे ट्रेनिंग लागली.परिणामी यात्रेची जबाबदारी ही प्रभारी सीईओ म्हणून माळोदे यांच्या खांद्यावर पडली.ठोबरे हे त्यांच्या कर्माने नागपूर वारीत आडकले.पंचायतला आलेली नव्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती कापसे यांनी यात्रेपासून स्वतःला चार हात लांब ठेवणे  पसंद केले.नियोजनात नको तितका ठोबरे यांनी चालविलेला हस्तक्षेप स्वतःची मालकी याप्रमाणे ठरला.त्यामुळे त्यांचे स्वतःचे हसू अधिक झाले. यातून आपण चुकल्याचे प्रायश्चित्त म्हणून ठोबरे यांनीआश्रू ही एकांतात गाळले असावे.असो असे प्रकार यात्रेत होत असतात.मात्र प्रभारी सीईओ माळोदे यांनी अधिकारी स्तरावर स्वतःचा मान व अपमान पचवीत त्यांनी यात्रेसाठी केलेले प्रयत्न यशस्वी म्हणावे लागतील.त्यामुळे विविध कार्यक्रम शेतकरी,पशुपालक यांच्या हिताचे व यात्रेकरूंच्या मनोरंजनाचे ठरले असे म्हणता येईल.