दहा रुपयांची नाणे व्यवहारात आणली जावी;नाणे न स्विकारल्यास कारवाई:-जिल्हाधिकारी राऊत

नांदेड

नांदेड,बातमी24:-दहा रुपयांची नाणी ही राज्यातील मोठ्या शहरात चलनात आहेत,मात्र इतर शहरात ती चलनात नसून नांदेड सारख्या शहरात कवडीमोल किंमत आहे.ही बाब प्रशासनाच्या लक्षात आली,असून नाणे व्यवहारात न स्वीकारणाऱ्यावर कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिला आहे.

जिल्हाधिकारी राऊत यांनी वेगवेगळ्या बँकांच्या शाखांना लिहलेल्या पत्रात म्हटले,की दहा रुपयांचे नाणे हे व्यवहारात वापरली जात नसून घेण-देणं करण्यास टाळाटाळ केली जात आहे, अशी बाब निदर्शनास आली असून यासंबंधी तक्रारी वाढत आहे. रीजर्व्ह बँकेने आतापर्यंत 14 प्रकारात दहा रुपयांची नाणे विकसित केली आहेत.ही सर्व नाणे वैध असल्याचे राऊत यांनी सांगितले.

दहा रुपयांच्या नाण्याबाबत भारत सरकारने सन 2016 साली व्यवहारात वैध चलन म्हणून स्वीकारण्याबाबत कळविले होते.मात्र अनेक शहरी व ग्रामीण भागात नाणे घेतली जात नाहीत.त्यामुळे विविध बँका व त्यांच्या शाखेकडून दहा रुपयांच्या नाणे बाबत व्यापक जनजागृती करावी,असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे,जे कुणी हे नाणे स्वीकारणार नाही,अशा इसमावर कारवाई करावी,असे निर्देश राऊत यांनी दिले.