रुग्ण संख्येने केला दहा हजाराचा टप्पा पार;24 तासात सव्वा तिनशे रुग्ण

नांदेड

 

नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या दहा हजार पार गेली आहे.मागच्या महिनाभरात रुग्णसंख्येत भरमसाठ वाढ झाली आहे.

गुरुवार दि.10 सप्टेंबर रोजी 1 हजार 334 जणांची तपासणी करण्यात आली,यात 941 निगेटिव्ह आले तर 327 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. आरटी पीसीआर चाचणीत 88 तर अँटीजनमध्ये 239 असे 327 रुग्ण आले,असून जिल्ह्यातील रुग्णांची कोरोना बाधित म्हणून 10 हजार 313 एवढी झाली आहे.

गुरीवारी 121 जणांना सुट्टी देण्यात आली,असून आतापर्यत 6 हजार 484 जण बरे झाले आहेत. सध्या 3 हजार 85 जणांवर उपचार सुरू आहेत.तर 59 रुग्ण हे अतीगभीर आहेत.
—–
तालुकानिहाय रुगसंख्या
नांदेड शहर-89,मुखेड-45,किनवट 38, नायगाव-16,धर्माबाद-13,लोहा-26,मुदखेड-21,उमरी-11,हदगाव-14 अशी सर्वाधिक रुग्ण संख्या आहे.
——-
तीन जणांचा मृत्यू
नांदेड शहरातील दत्त नगर येथील 64 वर्षीय पुरुषाचा दि.9 रोजी, नगीनाघाट येथील 60 वर्षीय महिलेचा दि.9 रोजी, तर कंधार तालुक्यातील शेकापूर येथील 65 वर्षीय पुरुषाचा दि.9 रोजी मृत्यू झाला.त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या 283 झाली आहे.