जिल्हाधिकार्‍यांनी अखेर उघडले डोळे बघितले नीट; रुग्णालयातील भोजनाबाबत घेतली दखल

नांदेड

नांदेड, बातमी24ः विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोनाच्या रुग्णांची जेवनावाचून परवड होत आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी उघडा डोळे बघा नीट; निकृष्ट जेवनात एकच चपाती या मथळयाखाली वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्तावरून जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर हे संबंधित बातमीदारावर आक्रमक झाले होते. मात्र त्या बातमीसंबंधी पुरावे दिल्यानंतर आणि वस्तुस्थिती त्यांनी जाणून घेतल्यानंतर जेवनाचा विषय गांभीर्याने घेत जेवनाबाबत सुधारणा केली जाईल, असे कळविले.

विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयातील रुग्णांना मागच्या चार ते पाच दिवसांपासून निकृष्ट जेवन तेही वेळेवर मिळत नसल्याने रुग्णांकडून बोंबाबोंब सुरु झाली होती. यात पोटाला पोटभरही रुग्णांना जेवन मिळत नव्हते. या संदर्भात बातमी24.कॉम ने जिल्हाधिकारी उघडा डोळे बघा नीट; निकृष्ट जेवनात एकच चपाती या मथळयाखाली गुरुवारी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास वृत्त प्रकाशित केले होते.

सदरचे वृत्त निरर्थक व बिनबुडयाचे असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना सुरुवातीला वाटले. त्यावरून बातमी प्रकाशित केल्याचे पुरावे देण्याची मागणी केली. मात्र यासंबंधीचे जेवनासंबंधी प्राप्त झालेले फ ोटो व व्हिडिओ त्यांच्या व्हॉटस अ‍ॅपवर पाठविल्यानंतर एका रुग्णांचा नंबर ही त्यांच्याकडे पाठविला. त्या रुग्णांस बोलून खात्री केल्यानंतर त्यांनी जेवनाबाबत सुधारणा करण्याचे आश्वासन दिले.
——-
जेवनाबाबत सुधारणा करू-डीन डॉ.देशमुख
रुग्णांना चांगले जेवन दिले जात आहे. मात्र रुग्णांच्या तक्रारी विचार करता पूर्वीसारखे चांगले जेवन देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती अधिष्ठता डॉ. सुधीर देशमुख यांनी सांगितले.