मृत्यूचा आकडा चिंताजनक; आजची रुग्णंसख्या पन्नाशीपार

नांदेड

नांदेड, बातमी24ः- कोरोनाची संख्या कमी अधिक होत असली, तरी मृत्यूचा आकडा ही तसाचा वाढत आहे. बुधवारी तब्बल चार जणांचा मृत्यू कोरोनाच्या संसर्गामुळे झाला. तर नव्याने 56 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे.

बुधवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार 249 नमूने तपासण्यात आले. यामध्ये 190 अहवाल निगेटीव्ह आले, तर 56 अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत.जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या एक हजार 74 झाली आहे. तर दुसरीकडे मृत्यूचा आकडा थांबण्याचे नाव घेत नसून मागच्या चौवित तासांमध्ये चार जणांचा मृत्यू कोरोनाच्या संसर्गामुळे झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मृत्यूचा आकडा 48 झाला आहे. यापूर्वी इतर जिल्हयातील काही रुग्णांचा नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

मरण पावलेले रुग्णांमध्ये हडको भागातील 62 वर्षीय सेवानिवृत्त अधिकारी, लोहा तालुक्यातील माळाकोळी येथील 63 वर्षीय, मुखेड तालुक्यातील अंबुलगा येथील 80 वर्षीय वृद्ध, तसेच लोहा शहरातील 80 वर्षीय वृद्धा सुद्धा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आज आलेल्या 56 रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण हे नांदेड, देगलूर व मुखेड तालुक्यातील आहेत.


——-
36 रुग्णांची प्रकृती गंभीर
जिल्ह्यातील 443 कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांवर जिल्ह्यातील विविध शासकीय रुग्णालय, कोविड के अर सेेंटर येथे उपचार सुरु आहेत. यातील 36 रुग्णांची प्रकृती नाजूक आहे. यामध्ये 13 महिला व 23 पुरुषांचा समावेश आहे.
——
19 रुग्ण बरे होऊन परतले
बुधवारी 19 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामध्ये मुखेड येथील 4, विष्णुपुरी शासकीय रुग्णालय6, देगलूर-1, पंजाब भवन-3, खासगी रुग्णालय 2 व औरंगाबाद संदर्भीत 3 असे 19 रुग्ण आहेत. त्यामुळे आतापर्यंत 574 बरे झाले आहेत.