नांदेड, बातमी24ः वरच्या धरणातील पावसाची सततधार सुरु असल्याने गोदावरी नदी पात्राचे रात्री आठ वाजेच्या सुमारास चार दरवाजे उघडण्यात आले आहेत. गोदावरी नदी दुथडी भरून वाहत असल्याने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.
विष्णुपुरी जलाशय जुलै महिन्यातच पूर्ण क्षमतेने शंभर टक्के भरला आहे. अधून-मधून या जलाशयाचे एक किंवा दोन दरवाजे उडण्यात आले आहेत. मागच्या चार ते पाच दिवसांपासून येलदरी व सिद्धेश्वर धरणाचे दहा दरवाजे उघडण्यात आले आहे. या पाण्याचा विसर्ग पूर्णा नदी पात्रात होत आहे. तर पूर्णा भागात पावसाने दमदार हजेरी लावल्याने ते पाणी गोदावरी नदी वाटे विष्णुपुरी जलाशयात जमा होत असल्याने या प्रकल्पाचे चार दरवाजे उघडण्यात आले आहे.
चार दरवाजे उघडले गेले असल्याने पाण्याचा विसर्ग 66 हजार 524 क्यमेक्स वेगाने गोदावरी पात्रात पाणी जात आहे. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने नदी काठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आल्याची माहिती या प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता निळकंट गव्हाणे यांनी दिली.