पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांचा अहवाल ही…

नांदेड

नांदेड, बातमी24ः- विधान परिषदेतील काँग्रेसचे प्रतोद आमदार अमरनाथ राजूरकर हे कोरोना पॉझिटीव्ह आल्यानंतर काही अधिकारी काळजीपोटी सावध झाले आहेत.  काही अधिकार्‍यांनी होम क्वॉरंटाईन असून पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर  यांनी सद्धा टेस्ट करून घेतली.

आमदार अमरनाथ राजूरकर हे मुंबई येथे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने गेले होते. या कार्यक्रमानंतर राजूरकर हे पालकमंत्र्यांनी आयोजित केलेल्या बैठकीसही हजर राहिले. त्या बैठकीस काही आमदार व अधिकार्‍यांची प्रमुख उपस्थिती होती. सोमवारी त्यांनी रॅपीड चाचणी घेतली असता, ते कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले. यानंतर काही अधिकार्‍यांनी स्वतः होम क्वॉरटांईन करून घेतले आहे. यामध्ये हदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषद प्रभारी सीईओ डॉ. शरद कुलकर्णी, महापालिका आयुक्त डॉ. लहाने आदी जण होम क्वॉरंटाईन झाले आहेत.

या सगळया पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी स्वतःहून दोन दिवसांपूर्वी कोरोना चाचणी करून घेतली होती.  अहवाल निगेटीव्ह आला आहे. होम क्वॉरंटाईन झालेले अधिकारी हे बुधवार किंवा गुरुवारी अहवाल देणार आहेत.