संचारबंदीच्या दंडावरून सत्र न्यायालयाने पोलिसांना फटकारले

नांदेड

नांदेड, बातमी24ः-न्यायालयाच्या कार्यालयीन वेळा ठरलेल्या आहेत. त्यामुळे न्यायालयाच्या वेळेप्रमाणे शासकीय कर्मचारी व सरकारी वकिल येत राहतील. अशा कर्मचारी व विधीज्ञांना अडवणुक करून दंड आकारल्याच्या कारणांवरून जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी पोलिसांना चांगलेच फ टकारले. चुकीच्या पद्धतीन लावलेल्या दंडाबाबत योग्य निर्देष देण्याबाबत पत्राव्दारे कळविले आहे.

न्यायालयाची कार्यालयीन वेळ ही सकाळी साडे दहा ते पाच वाजेपर्यंतची आहे. या कालावधीत कर्मचारी व वकिल मंडळी कामावर येता-जाता ओळखपत्र दाखवित असल्यास विनाकारण दंडात्मक कारवाई करू नये, असे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश दीपक अ. धोळकिया यांनी ठणकावले आहे. तसेच ज्या कर्मचार्‍यांना चुकीच्या पद्धतीने आकारलेल्या दंडाबाबत योग्य निर्देश देण्यात यावे, असे न्यायाधीश धोळकिया यांनी दिले आहेत.

पोलिस अधीक्षकांना लिहलेल्या पत्रात म्हटले, की दि. 14 जुलै रोजी शहरातील वजिराबाद चौक, तरोडा चौक व आयटीआय चौकात पोलिसांकडून न्यायालयाचे कर्मचारी विधीज्ञांना अडवून विचारणा केली गेली. ओळखपत्र दाखवून ही काही कर्मचारी व विधीज्ञ यांना दंड आकारण्यात आला. जिल्हाधिकार्‍यांच्या विधानाचा गैर अर्थ लावून दंड आकारला गेला आहे. मुळात न्यायालय कामकाज हे सकाळी अकरा वाजल्यापासून सुरु होते. असे पत्रात नमूद केले.