तेराशे जण कोरोनामुक्त तर साडे चौदाशे जण बाधित

नांदेड

नांदेड,बातमी24:- जिह्यात कोरोनाच्या रुग्णांच्या बाबतीत चढ-उतार सुरू असून शनिवार दि.17 रोजी 1 हजार 450 नवे बाधित रुग्ण आढळून आले आहेत.28 जणांच्या मृत्यूची नोंद झाली तर 1 हजार 305 जणांना सुट्टी देण्यात आली.

जिल्ह्यात 4 हजार 677 चाचण्या करण्यात आल्या.यात 1 हजार 50 पॉझिटिव्ह आले.यातील मनपा हद्दीत 405 जणांचा समावेश आहे.आरटीपीसीआर चाचणीत 676 व अंटीजनमध्ये 774 नोंदी आहेत.त्यामुळे जिह्यातील बाधित झालेल्याची संख्या 66 हजार 600 झाली असून यातील 51 हजार 385 कोरोनामुक्त झाले आहेत.सध्या 13 हजार 724 जणांवर उपचार सुरू आहेत.यातील 211 जणांची प्रकृती गंभीर आहे.
———
28 जणांचा मृत्यू
नांदेड जिल्ह्यात मृत्यूचा दर चिंता दर्शविणारा असून आज आलेल्या प्रेसनोटमध्ये 28 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.यात 12 महिला 16 पुरुषांचा समावेश आहे. त्यामुळे आतापर्यंत मरण पावलेल्या मृतांची संख्या 1हजार 230 एवढी झाली आहे.