यंदाची श्री क्षेत्र माळेगाव यात्रा प्लास्टिक अन हगणदरीमुक्त करू:-सीईओ मीनल करणवाल

नांदेड

नांदेड,बातमी24:-दक्षिण भारतातरील प्रसिद्ध श्री क्षेत्र माळेगाव यात्रा पुढील वर्षी जानेवारी महिन्यात पहिल्या आठवड्यात सुरुवात होणार आहे.या यात्रेची पूर्व तयारी प्रशासनाकडून केली जात आहे.या यात्रेत भाविक भक्त व व्यापाऱ्यांना सर्व सुविधा देण्याचा जिल्हा परिषदेचा प्रयत्न असून यंदाची यात्रा ही प्लस्टिक,कचरा व हगणदरीमुक्त असणार असल्याची माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी दिली.करणवाल यांनी अनौपचारिक संवाद पत्रकारांशी साधला.

श्रीमती करणवाल म्हणाल्या, की मालेगाव यात्रेची सप्टेंबर महिन्यापासून सुरू असून आतापर्यत किमान दहा ते बारा बैठक झाल्या आहेत.याबाबत लोहा-कंधार येथील उपविभागागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली असून कार्यक्रम पत्रिका बाबत नियोजन केले जात आहे.जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी सर्वांना सोबत घेऊन यात्रा यशस्वी केली जाणार आहे.या यात्रेचे निमंत्रण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री गिरीष महाजन यांना दिले जाणार असल्याचे करणवाल यांनी आवर्जून सांगितले.

माळेगाव येथील यात्रा ही सारंगखेडाच्या धरतीवर घोडेबाजार भरविला जाणार आहे.यात्रेत येणाऱ्या भाविकांची व व्यापारी वर्गाची गैरसोय होणार नाही,याची प्रशासनाकडून नियोजन केले जाणार आहे. अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस यंत्रणा ही सक्रिय असणार आहे.फायरब्रिगेड विभागाची यंत्रणा ही सज्ज असेल,अग्निशमनच्या गाड्या महत्वाच्या ठिकाणी असतील,तसेच यात्रेतून करवसुली करण्याचा मानस असल्याचे करणवाल यांनी सांगितले.