व्यापाऱ्यावरील हल्ला प्रकरणी व्यापाऱ्यांचा बंद

नांदेड

मुदखेड,बातमी24:-
मुदखेड येथील सराफा व्यापारी राघवेंद्र पवार यांच्यावरील झालेल्या हल्ला प्रकरणी आज शहरातील व्यापाऱ्यांनी सकाळपासून दुपारी बारा वाजेपर्यंत बाजारपेठ बंद ठेवून घटनेचा निषेध व्यक्त केला.
यावेळी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

मुदखेड शहरात ता.३१ रोजी सायंकाळी अज्ञात दरोडेखोरांनी प्रसाद ज्वेलर्सचे सराफा व्यापारी राघवेंद्र पवितवार यांनी आपले सराफी दुकान बंद करून त्याच इमारतीत वरच्या मजल्यावरती असलेल्या घराकडे जात असताना दरोडेखोरांनी सशस्त्र हल्ला करून त्यांच्याकडील सोन्या-चांदीच्या दागिन्याची व रोख रकमेची असलेली बॅग पळवण्याचा प्रयत्न केला. दरोडेखोरांनी राघवेंद्र पवितवार यांना जीवे मारण्याच्या हेतूने गावठी पिस्तूल कट्टा काढून गोळी झाडण्याचा प्रयत्न केला.

या वेळी व्यापाऱ्यांचे शिष्टमंडळ गणपती मंदिर पासुन पायी तहसिल कार्यालयात जाऊन नायब तहसिलदार जोगदंड यांना निवेदन देण्यात आले. या वेळी माजी नगरसेवक गंगाधर डांगे यांनी उपस्थित व्यापाऱ्यांना मार्गदर्शन करुन घटनेचा निषेध व्यक्त केला.